Sunny Leone: "आणि अनुष्का सापडली", सनी लिओनीने मानले देवाचे आभार! नेमकं काय घडलं होतं?

सनी लिओनीने नुकतेच हरवलेल्या मुलीची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर केले होते. आता अखेर ती मुलगी सापडली आहे.
Sunny Leone:Sunny Leone Viral Post:
Sunny Leone:Sunny Leone Viral Post: Esakal

Sunny Leone Viral Post: अभिनेत्री सनी लिओनीने तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यानेही जगभरातील लोकांची मने जिंकली आहेत. सनी मनोरंजन विश्वात जितकी सक्रिय असते तितकीच ती सामाजिक भानही जपत असते. सनी गरजूंना मदत करण्यातही नेहमी आघाडीवर आहे.

सनी लिओनीने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांकडून मदत मागितली होती. तिच्या घरी काम करणाऱ्या बाईची नऊ वर्षांची मुलगी अनुष्का , मुंबई येथून बेपत्ता झाली होती. जो कुणी अनुष्का किरण मोरेला सुखरूप घरी आणेल त्याला सनीने 50 हजार रुपयांचे बक्षीस देणार होती . आता सनीच्या प्रयत्नांना यश आले आहे.

Sunny Leone:Sunny Leone Viral Post:
Jay Kotak- Aditi Arya: अब्जाधीश कोटक घराण्याची सून आदिती आर्या आहे तरी कोण? मनोरंजन विश्वासोबत आहे खास नात

हरवलेली मुलगी अनुष्का आता सुखरूप घरी तिच्या परतली आहे. याबाबत सनीने एक पोस्ट करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. सनीने आता सोशल मीडियावर मुलीचा तिच्या पालकांसोबतचा भावनिक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अनुष्काच्या डोळ्यात अश्रू आहेत तर ती सापडल्याचा आनंद तिच्या पालकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

Sunny Leone:Sunny Leone Viral Post:
Kalabhavan Haneef Died: प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या 63 व्या वर्षी निधन!

हा फोटो शेअर करताना सनी लिओनीने लिहिले आहे की, 'सापडली. आमच्या प्रार्थनांना यश मिळालं.

पोस्टच्या कॅप्शनमध्ये सनी लिहिते की, 'आमच्या प्रार्थनांना उत्तर मिळालं! ईश्वर खूप महान आहे! ईश्वर कुटुंबाचे कल्याण करतो !! कुटुंबाच्या वतीने… मुंबई पोलिसांचे खूप खूप आभार आणि अनुष्का बेपत्ता झाल्यानंतर २४ तासांनी आम्हाला परत मिळाली.

आमची पोस्ट शेअर केल्याबद्दल आणि बातमी व्हायरल केल्याबद्दल माझ्या सर्व हितचिंतकांचे मी सर्वांचे मनापासून आभार मानते.' आता सनी लिओनीची पोस्ट व्हायरल होत आहे. चाहते तिचं कौतुक करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com