
ब-याच मोठ्या गॅपनंतर सनीला जीममध्ये वर्कआऊट करण्याची संधी मिळाली आहे. सनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये हिट ठरतोय.
मुंबई- लॉस एंजेलिसमध्ये लॉकडाऊनदरम्यान लागू केलेल्या नियमांवर काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे ज्यामध्ये जिम सुरु करण्यालासुद्धा परवानगी देण्यात आली आहे. अभिनेत्री सनी लिओनी या गोष्टीमुळे खूपंच आवंदी आहे. ब-याच मोठ्या गॅपनंतर सनीला जीममध्ये वर्कआऊट करण्याची संधी मिळाली आहे. सनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये हिट ठरतोय.
हे ही वाचा: १० वर्षाच्या चिमुकल्याने रेखाटलं अक्षय कुमारचं स्केच, ट्विटरवर अक्षयने केली स्तुती
सनीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती जीममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सनीने तोंडाला मास्क लावलं आहे. सनी या व्हिडिओमध्ये तिच्या हटके अंदाजात वर्कआऊट करताना दिसत आहे. सनीचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूपंच पसंत पडतोय. हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहे. स
नीने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, तीन महिन्यांनतर अखेर जीम सुरु झाली आहे. सनीचा हा व्हिडिओ ७ लाखांपेक्षा जास्त जणांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सनी सध्या पती डेनिअल वेबर आणि मुलं निशा, अशर आणि नोह यांच्यासोबत लॉस एंजेलिसमध्ये राहत आहे.
कोविड-१९ मुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. यादरम्यानंच सनी पती आणि तिच्या मुलांसोबत अमेरिकेला गेली आहे कारण तिच्या म्हणण्यानुसार या महारोगराईमध्ये ती भारतापेक्षा जास्त सुरक्षित अमेरिकेमध्ये राहिल. सनी सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांना गेले अनेक दिवस मनोरंजन करत आहे. सनीचे चाहते तिच्या फोटो आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात. सनीच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या ३ कोटींपेक्षा जास्त आहे.
sunny leone reaches gym after three months watch workout video