कोरोनाच्या काळात अभिनेत्री सनी लिओनी असा घालवतेय मुलांसोबत वेळ... व्हिडिओ व्हायरल

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 3 September 2020

एक व्हिडिओ सनीने पोस्ट केला आहे. यामध्ये ती तिच्यामुलांसोबत चांगला वेळ घालवताना दिसतेय. हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मुंबई- बॉलीवू़ड अभिनेत्री सनी लिओनी कोरोच्या काळात अनेक वेगवेगळे प्रयोग करताना दिसून आली. सोशल मिडियावर देखील ती खूपंच ऍक्टीव्ह असते.  लॉकडाऊनच्या काळात ती घरात बसून तिचे जे काही छंद जोपासत होती त्याने व्हिडिओ, फोटो शेअर करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. नुकताच असाच एक व्हिडिओ सनीने पोस्ट केला आहे. यामध्ये ती तिच्यामुलांसोबत चांगला वेळ घालवताना दिसतेय. हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे ही वाचा:  'सुशांत उपचारांदरम्यान रडायचा, त्याला आत्महत्येचे विचार येत होते' सुशांतच्या डॉक्टरचा दावा

अभिनेत्री सनी लिओनी तिच्या कुटुंबासोबत लॉस एंजेलिसमध्ये आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या काळात ती तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवत असून खासकरुन मुलांसोबत मजा-मस्ती करताना दिसतेय. नुकताच सनीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती मुलांसोबत पेंटिंग करताना दिसतेय. हा व्हिडिओ पोस्ट करताना सनीने लिहिलंय, निशा, नूह, अशहर आणि मी या विकेंडच्या शेवटपर्यंत ६ पेटिंग्स बनवल्या. ही तिच पेंटिंग आहे जी मी बनवली आणि यात निशाने मला मदत केली. आमचा सगळ्यात जवळचा मित्र मौसी मार्सीसाठी एक गिफ्ट. वाढदिवसाच्या शुभेच्छा, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. 

सनी लिओनीला लॉकडाऊनमध्ये याआधीही पेंटिंग करताना पाहिलं होतं. तीने स्वतः या काळात एक सुंदर पेंटिंग केलं होतं ज्याचा फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केलेला आणि ते पाहून चाहत्यांची तिच्या या कलेचं खूप कौतुक केलं होतं. या व्हिडिओमध्ये काढलेलं पेंटिंग देखील खूप सुंदर आहे. सनीचा यात एकदम कुल अंदाज पाहायला मिळतोय. या व्हिडिओत निशा तिला मदत करतेय तर दोघींनी मिळून काढलेलं हे पेटिंग सनीच्या चाहत्यांना खूप आवडलं असल्याने हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.   

sunny leone spending good time with kids amid corona pendamic  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunny leone spending good time with kids amid corona pendamic