Sunny Leonie : वाराणसीच्या घाटावर सनी लियोनीनं केली गंगेची आरती! फोटो व्हायरल

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सनी लियोनी ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे.
Sunny Leonie bollywood Actress share Ganga River Aarti
Sunny Leonie bollywood Actress share Ganga River Aartiesakal

Sunny Leonie bollywood Actress share Ganga River Aarti : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सनी लियोनी ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. सोशल मीडियावर सनी तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. आता तिचे गंगा आरती करतानाचे फोटो व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

यापूर्वी देखील सनी तिच्या बिनधास्त अंदाजामुळे लाईमलाईटमध्ये आली होती. एरवी ती तिच्या परखड प्रतिक्रिया देण्याच्या स्वभावासाठी परिचित आहे. ट्रोल करणाऱ्यांना देखील जशास तसे उत्तर देणाऱ्या सनीचे आगामी काळात मोठे प्रोजेक्ट प्रेक्षकांसमोर येणार आहे. बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते अनुराग कश्यपच्या एका चित्रपटामध्ये सनी चमकणार आहे. त्याची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

बॉलीवूड सेलिब्रेटी अभिनेत्रींना सपोर्ट करण्यात देखील सनीनं अनेकदा पुढाकार घेतला आहे. याशिवाय विविध सामाजिक कामांमध्ये तिचा सक्रिय सहभाग दिसून येतो. कोरोनाच्या काळात देखील सनीनं सामाजिक कामांमध्ये घेतलेल्या पुढाकाराचे चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी कौतुक केले होते. देश,जागतिक पातळीवर अनेक एनजीओशी सनी जोडली गेली आहे.

सध्या सनी लिओनी गायक अभिषेक सिंगसह तिच्या अलीकडील डान्स व्हिडिओच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी फिरत आहे. यावेळी सनीनं वाराणसी भेट दिली आहे. वाराणसी सारख्या धार्मिक शहराला तिने भेट दिली आणि सोशल मीडिया वर खास पोस्ट शेयर केली आहे. केनेडी अभिनेत्रीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.

या दौऱ्या दरम्यान सनीनं तिच्या पेहरावातून नेटकऱ्यांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. गुलाबी सलवार सूटमध्ये ती अगदीच पारंपारिक भारतीय पोशाखात कौतुकाचा विषय होती. त्यानंतर तिनं गंगा आरती वेळी परिधान केलेला पोशाख चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.

वाराणसीच्या काठावरील धार्मिक समारंभात सनी च्या उपस्थितीने सगळ्यांना भुरळ पडल्याचे दिसून आले. सनीने देखील हा सगळा अनुभव तिच्या सोशल मीडिया वर शेयर केला आहे. त्याला साजेस कॅप्शनही दिलं आहे. आपल्या पोस्टमध्ये ती म्हणते की, “वाराणसीमधला गंगा आरती पाहण्याचा सर्वात आश्चर्यकारक अनुभव. धन्यवाद!!

गंगा आरतीमध्ये परंपरांसोबत आधुनिकतेचे मिश्रण केल्याबद्दल चाहत्यांनी सनी लिओनीचे कौतुक केले. व्यावसायिक आघाडीवर सनी 'ग्लॅम फेम' वर जज म्हणून पदार्पण करण्याच्या तयारीत आहे जो लवकरच जिओ सिनेमावर प्रीमियर होणार आहे. अनुराग कश्यपचा निओ-नॉयर थ्रिलर 'केनेडी सोबतीला राहुल भट्ट अभिनीत, आणि तिचे तमिळ पदार्पण असलेला 'कोटेशन गँग ' हा चित्रपट येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com