सनी थिरकणार ट्रीपी ट्रीपी गाण्यावर

टीम ई सकाळ
मंगळवार, 25 जुलै 2017

तुरूंगवास भोगून आल्यानंतर संजय दत्तसाठी दोन चित्रपट महत्वाचे ठरले आहेत. पहिला, राजकुमार हिरानी बनवत असलेला त्याचा चरित्रपट आणि दुसरा तो काम करत असलेला भूमी हा चित्रपट. उमंग कुमार दिग्दर्शित या सिनेमा आता सनी लिओनीची एंट्री झाली आहे. 

मुंबई : तुरूंगवास भोगून आल्यानंतर संजय दत्तसाठी दोन चित्रपट महत्वाचे ठरले आहेत. पहिला, राजकुमार हिरानी बनवत असलेला त्याचा चरित्रपट आणि दुसरा तो काम करत असलेला भूमी हा चित्रपट. उमंग कुमार दिग्दर्शित या सिनेमा आता सनी लिओनीची एंट्री झाली आहे. 

सनी या सिनेमातल्या ट्रीपी ट्रीपी या गाण्यावर नाचणार आहे. हे एक आयटम साॅंग असून ते सचिन जिगर जोडीने संगीतबद्ध केले आहे. या गाण्याबद्दल भूमीची टीम भारी उत्सुक आहे. 2017 मधील हे सर्वात दिलखेचक गाणे असेल असा दावा करण्यात आला आहे. सनीच्या तारखा जुळत नसल्याने हा योग पुढे पुढे जात होता. मात्र अखेर सनीचे लटके झटके या सिनेमात पाहता येणार असल्याने तो या सिनेमाचा एक नवा यूएसपी ठरेल असा विश्वास उमंंग कुमारला वाटतो. 

Web Title: Sunny lioni in Bhoomi song esakal news