सुपरस्टार अबराम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

शाहरूख खानचा "रईस' चित्रपपट नुकताच प्रदर्शित झाला आणि बॉक्‍स ऑफिसवर चांगली कमाई देखील करतोय. चित्रपटाबाबत कितीही वाद झाले, तरी या देशात शाहरूखचे फॅन्स काही कमी नाहीत. याआधी आमिर खानच्या "दंगल' या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर कोटींची भरारी घेतली. सलमान खानचा "ट्युबलाईट' हा चित्रपटही येऊ घातलाय. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे बी टाऊनच्या खान्सची इतक्‍या वर्षांनंतरही बॉलीवूडमध्ये चलती आहे. पण "खान पर्व' संपल्यानंतर काय? बॉलीवूडचा सुपरस्टार कोण असेल? या प्रश्‍नावर शाहरूखने "अबराम आहे ना पुढचा सुपरस्टार', असं सांगितलं. तो आपल्या मुलाचं कौतुक करत म्हणाला, त्याला "रईस' हा चित्रपट खूपच आवडला होता.

शाहरूख खानचा "रईस' चित्रपपट नुकताच प्रदर्शित झाला आणि बॉक्‍स ऑफिसवर चांगली कमाई देखील करतोय. चित्रपटाबाबत कितीही वाद झाले, तरी या देशात शाहरूखचे फॅन्स काही कमी नाहीत. याआधी आमिर खानच्या "दंगल' या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर कोटींची भरारी घेतली. सलमान खानचा "ट्युबलाईट' हा चित्रपटही येऊ घातलाय. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे बी टाऊनच्या खान्सची इतक्‍या वर्षांनंतरही बॉलीवूडमध्ये चलती आहे. पण "खान पर्व' संपल्यानंतर काय? बॉलीवूडचा सुपरस्टार कोण असेल? या प्रश्‍नावर शाहरूखने "अबराम आहे ना पुढचा सुपरस्टार', असं सांगितलं. तो आपल्या मुलाचं कौतुक करत म्हणाला, त्याला "रईस' हा चित्रपट खूपच आवडला होता. "लैला मैं लैला' गाणं सुरू झाल्यावर त्याने डान्स करायला सुरुवात केली होती आणि जेव्हा माझे फायटिंग सीन्स होते, तेव्हा तो "बाबा जा, बाबा जा' असं ओरडत होता.' शाहरूखचा हा गोड मुलगा फक्त तीन वर्षांचा आहे. आता तो मोठा झाल्यावर सुपरस्टार अबराम बनणार की नाही ते कळेलच! 

Web Title: superstar abram

टॅग्स