
एकेकाळी सुपरस्टार असलेला हा अभिनेता मात्र नंतर अमिताभ नावाच्या वादळात कुठे तरी स्वतःला हरवत चालला होता. त्याला यशस्वी कमबॅक करण्यासाठी एका चांगल्या स्क्रीप्टची आवश्यकता होती. त्याच्या शोधात तो कमालीचा झपाटून गेला होता.
मुंबई : 'आराधना', 'दाग', 'कटी पतंग', 'दो रास्ते', 'आनंद', 'नमक हराम', 'दु्श्मन' असे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणारे अभिनेते राजेश खन्ना. एकेकाळी सुपरस्टार असलेला हा अभिनेता मात्र नंतर अमिताभ नावाच्या वादळात कुठे तरी स्वतःला हरवत चालला होता. त्याला यशस्वी कमबॅक करण्यासाठी एका चांगल्या स्क्रीप्टची आवश्यकता होती. त्याच्या शोधात तो कमालीचा झपाटून गेला होता. याच वेळी लेखक व दिग्दर्शक तसेच निर्माते इस्माईल श्रॉफ त्याला भेटले आणि त्यांनी कथा ऐकविली. राजेश खन्ना यांनी हा चित्रपट स्वीकारला आणि तोच चित्रपट त्यांच्या यशस्वी कमबॅक करणारा ठरला. तो चित्रपट होता 'थोडीसी बेवफाई'...
वाचा ः आम्हीही नाही जाणार शाळेला; विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांचाही नकार...
आज या चित्रपटाला तब्बल चाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट राजेश खन्ना यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होता. कारण त्यांच्या करिअरची घडी काहीशी विस्कळित झाली होती. तो जमाना अॅग्री यंग मॅनचा होता. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत पुन्हा खंबीरपणे उभे राहण्यासाठी एका चांगल्या चित्रपटाची गरज होती. ती या चित्रपटामुळे पूर्ण झाली आणि राजेश खन्ना यांच्या सेकंड इनिंगची घोडदौड वेगाने सुरू झाली. 13 जून 1980 मध्ये थोडीसी बेवफाई हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये राजेश खन्ना आणि शबाना आझमी यांची मुख्य भूमिका होती.
वाचा ः राज्यातील 'या' 12 जिल्ह्यांमध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरु करण्याचे न्यायालयाचे सरकारला आदेश...
पती-पत्नीच्या आयुष्यात अनेक चढउतार येतात. अशा वेळी दोघांनीही एकमेकांवर विश्वास ठेवून खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. विशेष करून पत्नीने लग्नानंतर पतीचे कुटुंब आपलेच मानले पाहिजे हेच या चित्रपटाद्वारे सांगण्यात आले आहे. या चित्रपटातील गीते गुलजार यांची होती आणि या गीतांना संगीतसाज खय्याम यांनी चढविला होता. हिंदी चित्रपटसृष्टीतीलहे दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वे पहिल्यांदाच एकत्र काम करीत होते.
वाचा ः जडेजा, पुजारासह पाच क्रिकेटपटूंना उत्तेजक प्रतिबंधक संस्थेची नोटीस; काय झालंय नेमकं?
त्यांनी आखोमे हमने आपके सपने सजाए है- किशोर, आज बिछडे है- भुपींदर सिंह, बरसे फुहार- आशा भोसले, हजार राहे मुड के देखी- किशोर, लतादीदी, मौसम मौसम लव्हली मौसम- अनवर, सुलक्षणा पंडीत, सुनो ना भाभी- जगजीत कौर, सुलक्षणा पंडित अशी सरस गाणी दिली या चित्रपटानंतर राजेश खन्ना यांनी 'अवतार', 'सौतन', 'आखिर क्यू' असे काही चित्रपट केले. परंतु त्यांची सेकंड इनिंग यशस्वी सुरू झाली ती 'थोडीसी बेवफाई' या चित्रपटामुळेच...