सिद्धार्थचा बिनधास्त अंदाज 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

सिद्धार्थचा "बार बार देखो' हा चित्रपट फ्लॉप गेल्यानंतर आता तो ग्रेट राजेश खन्ना यांच्या "इत्तेफाक' या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करतोय. हा चित्रपट 1969 मध्ये प्रदर्शित झाला होता. ही एक मर्डर मिस्ट्री आहे. ज्यामध्ये एका कलाकारावर आपल्या बायकोच्या खुनाच्या आरोप आहे आणि त्या रात्री तो एका श्रीमंत स्त्रीबरोबर आपला वेळ घालवतो, जी आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या रहस्याबरोबर जगतेय. हा रिमेक चित्रपट रेड चिली एण्टरटेंन्मेंट, धर्मा प्रॉडक्‍शन आणि बीआर फिल्मस्‌ यांची एकत्र निर्मिती आहे. सिद्धार्थ या चित्रपटात मुख्य भूमिका करतोय, जी राजेश खन्ना यांनी केली होती.

सिद्धार्थचा "बार बार देखो' हा चित्रपट फ्लॉप गेल्यानंतर आता तो ग्रेट राजेश खन्ना यांच्या "इत्तेफाक' या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करतोय. हा चित्रपट 1969 मध्ये प्रदर्शित झाला होता. ही एक मर्डर मिस्ट्री आहे. ज्यामध्ये एका कलाकारावर आपल्या बायकोच्या खुनाच्या आरोप आहे आणि त्या रात्री तो एका श्रीमंत स्त्रीबरोबर आपला वेळ घालवतो, जी आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या रहस्याबरोबर जगतेय. हा रिमेक चित्रपट रेड चिली एण्टरटेंन्मेंट, धर्मा प्रॉडक्‍शन आणि बीआर फिल्मस्‌ यांची एकत्र निर्मिती आहे. सिद्धार्थ या चित्रपटात मुख्य भूमिका करतोय, जी राजेश खन्ना यांनी केली होती. सिद्धार्थ म्हणतो, या चित्रपटातील भूमिकेविषयी मला कसलंच प्रेशर नाही. मी राजेश खन्ना यांचा खूप मोठा फॅन आहे. त्यांचे बहुतेक चित्रपट मी पाहिले आहेत आणि हा चित्रपट जशाचा तसा रिमेक नसून थोडेफार बदल करण्यात येणार असल्याने मला त्यांच्या जागी फिट बसायचं नाहीय. मला अभिनयासाठी भरपूर वाव आहे. मी याआधी कधीही मर्डर मिस्ट्री केलेली नाही. त्यामुळे मी या चित्रपटासाठी खूपच एक्‍सायटेड आहे.' सिद्धार्थचा राजेश खन्ना यांचा "आनंद' हा चित्रपट सगळ्यात आवडता असल्याचे तो सांगतो. या चित्रपटात सिद्धार्थबरोबर सोनाक्षी सिन्हाही मुख्य भूमिकेत आहे. 

Web Title: superstar siddhartha in itafak