
सैफला सतावतेय मोठा मुलगा इब्राहिमची चिंता; म्हणाला,'मी प्रार्थना करतो...'
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानचा(Saif Ali khan) मोठा मुलगा इब्राहिम अली खानने (Ibrahim Ali khan) बॉलीवूडमध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली आहे. सध्या तो कॅमेऱ्यामागचा फिल्म मेकिंगचा अनुभव घेत आहे. सध्या इब्राहिम करण जोहरला त्याच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमासाठी असिस्ट करत आहे. या सिनेमात आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहेत. आता इतक्या लवकर इब्राहिमला एवढ्या मोठ्या दिग्दर्शकाच्या बड्या सिनेमासाठी काम करायला मिळालं असलं तरी वडील सैफ अली खानला मात्र आपल्या मुलाच्या करिअरला घेऊन टेन्शन आलं आहे. अर्थात असं असलं तरी सैफनं म्हटलं आहे की त्याचा मुलगा मेहनती आहे,आणि यासाठी मात्र तो समाधानी आहे.
हेही वाचा: 'कॉफी विथ करण ' नव्या सिझनला लागला ब्रेक; करण जोहरनं केली मोठी घोषणा
सैफ अली खाननं एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोठा मुलगा इब्राहिम विषयी प्रश्न विचारल्यावर म्हटलं आहे, ''मी त्याच्या भविष्यासाठी थोडं चिंतेत आहे. पण तरिही मी खूश आहे की तो मेहनत करत आहे. तो त्याच्या शाळेच्या अभ्यासातही चांगला होता. पण तरीही अगदी इतर पालकांप्रमाणे मी घाबरलोय. आणि प्रार्थना करत आहे की माझ्या मुलाचं भविष्य चांगलं घडू दे''. इब्राहिम अली खान अगदी सैफ अली खानसारखाच दिसतो असे अनेक चाहते बोलून दाखवतात यावर सैफ म्हणाला आहे,''हो,तो स्वतःच मला सांगतो की पप्पा तुम्ही तरुण असताना जसं दिसायचात तसाच मी दिसतो. त्यानं त्याचा एक फोटो मला पाठवला ज्यात तो खूप हॅन्डसम दिसत होता. त्यानं मला फोटो पाठवताना लिहिलं,तुम्ही २० वयाचे असताना असेच दिसत असाल''.
हेही वाचा: ईदच्या पार्टीत शहनाझ-सलमानची जवळीक कॅमेऱ्यात कैद; kiss करतानाचा Video Viral
सैफ अली खाननं या मुलाखतीत हृतिक रोशन सोबतच्या 'विक्रम वेधा' सिनेमातील त्याच्या भूमिकेविषयीही संवाद साधला आहे. ''या सिनेमाचं स्क्रीप्ट खूप चांगलं आहे,मी खूप वर्षांनी अशा चांगल्या स्क्रिप्टच्या सिनेमात काम करीत आहे. हृतिक शिवाय कुणीच त्या रोलला चांगलं साकारू शकलं नसता असंही सैफ म्हणाला आहे. मला या सिनेमासंदर्भात खूप उत्सुकता आहे. मला आशा आहे की लोकांना या सिनेमातील माझं कामही आवडेल''. आपल्या माहितीसाठी सांगतो की, 'विक्रम वेधा' हा सिनेमा तामिळ सुपरहिट सिनेमाचा रीमेक आहे. तामिळमध्ये देखील 'विक्रम वेधा' हेच नाव होतं. सैफ अली खान ओम राऊत दिग्दर्शित करत असलेल्या 'आदिपुरुष' सिनेमात देखील दिसणार आहे. या सिनेमात तो रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात सैफ सोबत प्रभास आणि कृती सनन देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
Web Title: Saif Ali Khan Speaks About His Son Ibrahim Ali
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..