'सूर नवा ध्यास नवा - पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे' कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक!

Sur Nava Dhyas Nava Utkarsh Wankhede became the winner singing contest
Sur Nava Dhyas Nava Utkarsh Wankhede became the winner singing contestSur Nava Dhyas Nava Utkarsh Wankhede became the winner singing contest

मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीमा पार करत सुमारे पाच हजार स्पर्धकांनी या मंचावरून आपलं सुरांचं नशीब आजमावण्याचं स्वप्न पाहिलं.

या कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला. या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. १६ स्पर्धकांबरोबर सुरु झालेल्या या प्रवासामध्ये स्पर्धकांना बरेच काही शिकायला मिळाले आणि याच स्पर्धकांमधून कार्यक्रमाच्या मंचाला अंतिम सहा शिलेदार मिळाले. त्यांची नावे आरोही प्रभुदेसाई, उत्कर्ष वानखेडे, शुभम सातपुते, संज्योती जगदाळे, नवाब शेख आणि कल्याणी गायकवाड. या स्पर्धकांमध्ये सूर नवा ध्यास नवाचा महाअंतिम सोहळा रंगला.

महाअंतिम सोहळ्यामध्ये गाण्याची मैफल रंगली आणि या मधूनच महाराष्ट्राला मिळाला नवीन सूर. भारतीय चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय संगीतकार कल्याणजी - आनंदजी या जोडीतील आनंदजी यांच्या हस्ते सूर नवा ध्यास नवाच्या विजेत्याच नाव घोषित करण्यात आले. या स्पर्धेत उत्कर्ष वानखेडे याने सूर नवा ध्यास नवाचा राजगायक होण्याचा मान पटकावला.

Sur Nava Dhyas Nava Utkarsh Wankhede became the winner singing contest
...तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रिया

विजेता उत्कर्ष वानखेडेला कलर्स मराठीतर्फे दोन लाख रुपये, चंदूकाका सराफ अँड सन्स यांच्याकडून सुवर्ण कटयार मिळाली तसेच केसरी टूर्सतर्फे काश्मीर टूर आणि तोडकर संजीवनी कडून इलेक्ट्रिक स्कूटर. तर या स्पर्धेत संज्योती जगदाळे पहिली उपविजेती ठरली. तिला कलर्स मराठीकडून एक लाखाचा धनादेश, केसरीकडून केरला टूर, महाभृंगराज ऑइलकडून पंचवीस हजाराचा धनादेश, आरोही प्रभुदेसाई ही दुसरी उपविजेती ठरली. तिला कलर्स मराठीकडून ७५ हजारांचा धनादेश, केसरीकडून हिमाचल टूर, महाभृंगराज ऑइलकडून पंचवीस हजाराचा धनादेश देण्यात आला.

Sur Nava Dhyas Nava Utkarsh Wankhede became the winner singing contest
मारुती उद्या लॉंच करणार सर्वाधिक मायलेज असलेली 'ही' नवीन SUV, वाचा डिटेल्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com