
सुरवीन चावला: मला Decoupled मध्ये करायची होती माधवनची भूमिका
अभिनेत्री सुरवीन चावला (Surveen Chawla) आणि अभिनेता आर माधवन (R.Madhavan) नेटफ्लिक्सच्या (Netflix) 'डीकपल्ड' (Decoupled) मध्ये आधुनिक काळातील नातेसंबंधांची (modern-day relationships) कहाणी जिवंत करण्यासाठी सज्ज आहेत.
या वेब शोमध्ये श्रुती आणि आर्या हे दोन विभक्त जोडपे दिसणार आहेत जे सह-पालक बनण्याचा प्रयत्न करत असताना वैवाहिक कलहाचा सामना करत आहेत. ट्रेलरमध्ये (Trailer), कलाकार एका काउंसीलर सोबत संभाषण करताना दिसतात आणि विभक्त होण्याच्या मार्गावर असलेल्या जोडप्याला पाहण्यात कोणालाच रस नसतो हे नमूद केले आहे.
एका चॅटमध्ये, सुरवीन आश्चर्यचकित होते की केवळ प्रेक्षक शोची दखल घेत नाहीत तर तिला काही आश्चर्यकारक प्रतिक्रिया देखील मिळाल्या आहेत.
“इतरांना त्रास होतो हे पाहण्यापेक्षा अजून बरेच काही जगात आहे. Decoupled देखील अशीच एक सिरीज आहे, जी बर्याच काळापासून Netflix वर पाहिली नाही. माझ्या मते हाच USP आहे. तसेच, मला मिळालेली सर्वात मोठी प्रशंसा, जी माधवनने मला सांगितली, ती म्हणजे हा शो एक उत्कृष्ट अँटीडिप्रेसंट (Antidepressant) वाटतो. यामुळे लोकांना असे काहीतरी का पहावेसे वाटते हे लक्षात येते,” ती म्हणाली.
या अभिनेत्रीच्या लग्नाला सहा वर्षे झाली आहेत. तिने कबूल केले की Decoupled ची स्क्रिप्ट तिच्या घरी मारत असलेल्या गप्पां सारखी वाटली.
''मनु (author Manu Joseph) यांनी ते अप्रतिम लिहिले होते. मी फक्त दुसऱ्या एपिसोडवर होते तोपर्यंत मी पूर्णपणे पात्रामध्ये गेले होते. मी खरं तर हसत जमिनीवर होते. तसेच, मला आर्याचे पात्र खूप आवडले आणि मी त्याची भूमिका साकारू शकेन का असे विचारत मनूला फोन केला. मी त्या पात्राच्या खूप प्रेमात होते. कागदावर असताना, श्रुती कदाचित आणखी एका महत्त्वाकांक्षी, उत्कट मुलीसारखी वाटू शकते, ती एका खडतर पॅचमधून जात आहे. पण ती काळाबरोबर खूप आव्हानात्मक बनली. सूड आणि वैमनस्य टिकवून ठेवण्यासाठी, आम्हाला ते नाजूक आणि प्रिय ठेवायचे होते. आणि एकदा तुम्ही शो पाहिल्यानंतर तुम्हाला तिच्याबद्दल अधिक माहिती मिळेल.''
हेही वाचा: आलियाने कोरोना नियमावलीचं उल्लंघन केलं नाही- BMC
या शोमध्ये वैवाहिक समस्यांशी निगडित एक यशस्वी करिअर-देणारी स्त्री दाखवण्यात आली आहे. अनेकांचा असा विश्वास आहे की काम आणि घरामध्ये संतुलन राखणे अशक्य आहे. पण सुरवीनचा वैयक्तिक अनुभव काय आहे? “हे खरोखर कठीण आहे. एखादा माणूस त्याला हवे ते होऊ इच्छितो. कोणीही त्याला कधीही विचारणार नाही की तो वडिलांची कर्तव्ये करत आहे का, परंतु स्त्रीसाठी ही नेहमीच मोठी गोष्ट असते. फक्त ‘तुम्ही कसे मॅनेज करणार आहात?’ हा प्रश्न मला खिळवून ठेवतो. हा प्रश्न कोणीही विचारूच कसा शकतो हे
मला आजवर कळाले नाही. हे खूप निंदनीय आहे,” तिने शेअर केले.
Web Title: Surveen Chawla I Wanted To Play Madhavans Character In Decoupled
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..