Surya Kiran Death : प्रसिद्ध दिग्दर्शक सुर्या किरण कालवश, सुमंथ अन् जेनेलियाच्या 'त्या' चित्रपटातून मिळाली होती लोकप्रियता!

जेनेलिया आणि सुमंथच्या त्या (Surya Kiran Death) चित्रपटानं त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती.
Surya Kiran Death
Surya Kiran Death esakal

Telugu director Surya Kiran died : साऊथ चित्रपट विश्वाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक सुर्या किरण यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी त्यांचे एका दुर्धर आजारानं निधन झाले आहे. आपल्या हटक्या शैलीच्या दिग्दर्शनामुळे सुर्य किरण हे लोकप्रिय होते. त्यांच्या निधनानं साऊथ चित्रपट क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना कावीळची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचे अकरा मार्च रोजी निधन झाले. तेलुगू चित्रपट विश्वात बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. सत्यम, धना ५१ सारख्या चित्रपटांचे त्यांनी केलेले दिग्दर्शन त्यांच्या फिल्मोग्राफीमधील मोठी कामगिरी समजली जाते. त्यांच्या निधनानंतर साऊथमधील अनेक कलाकारांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

चैन्नईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. बालकलाकार म्हणून त्यांनी दोनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यात मौना गिथांगल आणि पडुकथावन या चित्रपटांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. त्यांनी २००३ मध्ये सत्यम नावाच्या चित्रपटातून डेब्यू केलं होतं. त्यात सुमंथ आणि जेनेलिया यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

Surya Kiran Death
Oscars 2024: श्वानाची हजेरी, नग्न अवस्थेत जॉन सीना आणि अभिनेत्रीचा ड्रेस...; यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात काय-काय घडलं?

सत्यम या चित्रपटानं त्यांना वेगळी ओळख मिळाली होती. त्यानंतर २००५ मध्ये आलेल्या धना ५१ मध्ये त्यांनी पुन्हा समंथासोबत काम केले होते. त्यानंतर त्यांनी ब्रम्हास्त्रम (२००६) राजू भाई (२००७) आणि चॅप्टर ६ (२०१०) चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. केवळ चित्रपटच नाही तर तेलुगू टीव्ही मनोरंजन विश्वातही ते सक्रिय होते. त्यांनी तेलुगू बिग बॉस ४ मध्ये सहभाग घेतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com