सुशांत-क्रिती पुन्हा रोमॅंटिक! 

वृत्तसंस्था
सोमवार, 10 जुलै 2017

सुशांतसिंग राजपूत आणि क्रिती सेनॉनचा "राबता' चित्रपट नुकताच येऊन गेला. चित्रपट फारसा चालला नाही; पण दोघांची सिझलिंग केमिस्ट्री पाहण्यासारखी होती.

चित्रपटादरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चांनाही ऊत आला होता. सुशांत आणि त्याची प्रेयसी अंकिता लोखडे यांच्या ब्रेकअपने तर त्यात खतपाणीच घातलं... पण काहीही म्हणा दोघांची केमिस्ट्री पाहून त्यांच्यात अफेअर नाही, असं कोणी म्हणणारच नाही. बॉलीवूडचं सध्याचं रोमॅंटिक कपल असलेल्या सुशांत-क्रितीच्या केमिस्ट्रीमुळेच त्यांच्यावर "टी सीरिज'नं एक रोमॅंटिक गाणं चित्रित केलंय.

"पास आओ' असे त्याचे बोल आहेत. अरमान मलिक आणि प्रकृती कक्कडनं ते गायलंय. गाण्यात दोघंही रोमॅंटिक मूडमध्ये असून, त्यांचा डान्सही सिझलिंग झालाय. आम्ही एकमेकांबरोबर काम करण्याबाबत खूप कम्फर्टेबल आहोत, असं दोघांनी "राबता'च्या प्रमोशनमध्येच सांगितलं होतं. म्हणूनच भविष्यात त्यांचे आणखी चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळतील, असं दिसतंय. 

Web Title: Sushant-Kriti again romantic!