सुशांत सिंह राजपूतची ऑडीओ क्लिप आली समोर, बॉलीवूड सोडण्याची करत होता गोष्ट

sushant audio clip
sushant audio clip

मुंबई- सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आता एक ऑडीओ क्लिप समोर आली आहे. ही ऑडीओ क्लीप एका वृत्तवाहिनीच्या हाती लागली आहे. यामध्ये सुशांत, रिया, रियाचे वडिल इंद्रजीत चक्रवर्ती आणि काही वित्तीय सल्लागार एकत्र बसून सूशांतच्या फायनॅनशिअल मॅनेजमेंटबाबत बोलत आहेत. सुशांत यामध्ये ट्रस्ट बनवण्याबाबत बोलत आहे. सुशांत त्याच्या भविष्याविषयीच्या काही गोष्टी सांगत आहे. सोबतंच तो त्याच्या रिटायरमेंट प्लानिंगबद्दल देखील बोलत असल्याचं सांगण्यात येतंय.. 

या वाहिनीने दावा केला आहे की ३६ मिनिटांची ही ऑडीओ क्लिप ऐकल्यानंतर असं कळतंय की सुशांतने वित्तीय सल्लागारांना त्याच्या आगामी प्लानिंगसाठी बोलवलं होतं. या ऑडीओमध्ये सुशांत बॉलीवूड सोडण्याविषयी, त्याच्या रिटायरमेंटविषयी आणि त्याच्या आजाराविषयी बोलत असल्याचतं म्हटलंय. तसंच रिया आणि इंद्रजीत चक्रवर्ती देखील त्यांची बाजू मांडत आहेत. रिया सुशांतच्या पैशांची एफडी बनवण्याच्या प्लानिंगची तयारी करत होती.

ऑडीओ क्लिपमध्ये रिया म्हणतेय की  'सुशांतच्या पैशांची एफडी तयार केली पाहिजे. सुशांतच्या कार्डमध्ये १० ते १५ लाखांपेक्षा जास्त नसतील. दुसरी गोष्ट जे पैसै सुशांतकडे आहेत त्यावर त्याला व्याज मिळेल. सुशांतची सेव्हिंग देखील सुरक्षित राहिल. सुशांतच्या साईनशिवाय कोणीच एफडी तोडू शकणार नाही.' सुशांत या ऑडीओमध्ये बोलतोय की त्याला शहरातून निघून जायचं आहे. त्यात रिया बोलतेय की आम्हाला पहिले गोव्याला जायचं आहे. एक-दोन महिने तिथे राहू. त्यानंतर आपण निर्णय घेऊ. 

सुशांत ऑडीओमध्ये बोलतोय, 'मी केवळ एक निवेदन करु इच्छितो  आपण हे सगळं संपवू शकतो आणि आपला पैसा वाचवू शकतो. हा इथे मी माझ्या मेंदूशी देखील लढत आहे. हाच सगळ्यात कठीण काळ आहे जो मी कधीच पाहिला नाहीये.' रियाने या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की सुशांतला पैसे उडवण्याचा शौक होता. मात्र या ऑडिओमधून उलटंच दिसून येत आहे. या ऑडीओमध्ये सुशांत पैसे सुरक्षित ठेवण्याबद्दल बोलत असल्याचं त्यांनी म्हटलंय.   

sushant singh rajput audio cilp retirment plans financial management rhea chakraborty  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com