
Urfi Javed video: 'माझ्यापेक्षा मोठी चेटकीण'..उर्फीचा व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांना अप्रत्यक्ष टोला
विचित्र फॅशन सेन्समूळे ओळखली जाणारी उर्फी जावेद ही सध्या तिचा आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वादामुळं चर्चेत आहे. ती कधी कोणती फॅशन करेल याचा काही भरोसा नाही.
उर्फी जावेद कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असते आणि त्यामूळे ट्रोलच्या निशाण्यावर येते. आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिमपर्यंत बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिले आहे. आता उर्फी जावेदने पुन्हा एकदा बोल्डनेसची हद्द पार केली आहे.
हेही वाचा: Rakhi Sawant Miscarriage: आई होण्याचं राखीचं स्वप्न भंगल
आज पुन्हा उर्फी जावेदने तिचा नवा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तिने तिच्या अंगाभोवती वेणी गुंडाळलेली दिसत आहे. उर्फी कपड्यांशिवाय बिनधास्तपणे कॅमेऱ्यासमोर उभी असलेली दिसतेय त्याचा यावेळी तिने तिचा शरीराचा काही भाग हा तिच्या केसांच्या वेणीने काही भाग झाकला आहे. हा व्हिडिओ काही तासांतच व्हायरल झाला आहे.
हेही वाचा: Urfi Javed: हमसे दुर और दफा रहो... म्हणत उर्फीनं थेट इशाराच दिला..आता काही खरं नाही!
उर्फी जावेद तिच्या नवनवीन प्रयोगांसाठी ओळखली जाते. कधी टेपने गुंडाळलेल्या, कधी साखळ्यांनी, उर्फीने नेहमीच लोकांच्या विचारांच्या पलीकडे तिचे कपडे डिझाइन केले आहेत. यापूर्वी देखील उर्फी अनेक गोष्टींनी तिचे शरीर झाकून टॉपलेस दिसली आहे. पण यावेळी तिने चेटकीण सारखी वेणी घालून तिचे शरीर झाकलेले आहे. या व्हिडीओवर यूजर्सशिवाय सर्व कलाकारांच्याही कमेंट्स आल्या आहेत.
हेही वाचा: Urfi Javed: उर्फीकडून चाकणकरांच कौतुक तर चित्रा वाघ याचं..ट्विट व्हायरल
टिव्ही सीरियल ‘नजर’ मधील कलाकार सोनया अयोध्याने उर्फीच्या व्हिडिओला मजेशीर कमेंट केली आहे. तिने लिहिलयं, 'ही माझी वेणी आहे,रुबी चेटकीणची वेणी' त्यावर उर्फी प्रतिक्रिया देत म्हणाली, 'यावेळी माझ्यापेक्षा मोठी चेटकीण कोण असेल' त्याचबरोबर नेहमी प्रमाणे काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही केलं आहे.