Sushant Singh Rajput: 'त्या' फ्लॅटमध्ये अडीच वर्षांपासून... मालकानं सांगितले, मला तिथे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushant Singh Rajput

Sushant Singh Rajput: 'त्या' फ्लॅटमध्ये अडीच वर्षांपासून... मालकानं सांगितले, मला तिथे...

Sushant Singh Rajput bollywood actor sucide Mumbai flat : बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनं मोठी खळबळ उडाली होती. अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवलेल्या सुशांतच्या जाण्यानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्याचे जाणे हे चाहत्यांच्या मनात खोलवर जखम करुन गेले होते.

सोशल मीडियावर सुशांत, त्याच्या आत्महत्येचा तपास, त्याची गर्लफ्रेंड याविषयी नेटकरी दरवेळी वेगवेगळी माहिती शोधताना दिसून येतात. सुशांत ज्या फ्लॅटमध्ये राहत होता तो फ्लॅट गेल्या अडीच वर्षांपासून रिकामा आहे. त्यामध्ये कुणी राहायला तयार नाही. त्याचे कारण फ्लॅट मालकानं सांगितले आहे. मुंबईतील बांद्रयामध्ये राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्या घरात नवीन भाडेकरु शोधण्यासाठी घरमालकाला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

हेही वाचा: Shruti Marathe: तुझ्यात जीव रंगला...!

गेल्या अडीच वर्षांपासून सुशांतनं आत्महत्या केलेलं ते घर खाली आहे. रियल इस्टेट ब्रोकर रफीक मर्चंट यांनी याविषयी सांगितलं आहे की, आता काही झालं तरी ते घर कुणा एखाद्या सेलिब्रेटीला राहायला द्यायचं नाही. सी फेस असणाऱ्या त्या फ्लॅटचे भाडे हे महिना पाच लाख रुपये एवढे आहे. मात्र त्याला भाडेकरु मिळणे अवघड झाले आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर तिथे कुणी फारसं राहायला तयार नाही. लोकांच्या मनात वेगळ्या भावना आहेत. दुसरं म्हणजे, काही सेलिब्रेटी यायला इच्छुक आहेत. मात्र त्यांना तो फ्लॅट द्यायचा नाही.

हेही वाचा: माणुसकीलाही लाजवेल अशी प्राण्यांची मैत्री; भावनिक Video Viral

ज्याचा तो फ्लॅट आहे तो एनआरआय आहे. त्यानं आपल्याला कुण्या बॉलीवूडच्या कलाकाराला तो द्यायचा नाही. असं सांगितलं आहे. त्यामुळे तो एका कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्तींच्या शोधात आहे ज्यांना त्याठिकाणी राहायचे आहे. १४ जुन रोजी २०२० रोजी राहत्या घरी आत्महत्या केली होती.