सुशांत केस अपडेट: बिहार पोलिसांची स्पेशल टीम मुंबई क्राईम ब्रांच ऑफीमध्ये पोहोचली, तपास सुरु

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 29 July 2020

रियावर सुशांतचे पैसे हडपल्याचा आणि त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप आहेत. आता या प्रकरणात अधिक तपासासाठी बिहार पोलिसांची एक स्पेशल टीम मुंबई क्राईम ब्रांच कार्यालयात पोहोचली आहे.

मुंबई-  अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडिल के के सिंह यांनी सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल केली आहे. रियावर सुशांतचे पैसे हडपल्याचा आणि त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप आहेत. एफआयआर पटनामध्ये दाखल केली गेली आहे. आता या प्रकरणात अधिक तपासासाठी बिहार पोलिसांची एक स्पेशल टीम मुंबई क्राईम ब्रांच कार्यालयात पोहोचली आहे.

हे ही वाचा: १५ कोटी रुपये ते दागिने गायब होण्यापर्यंत, सुशांतच्या वडिलांनी एफआयआरमध्ये उपस्थित केले हे सात मोठे प्रश्न

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांसोबतंच बिहार पोलीस देखील ऍक्टीव्ह झाले आहेत. रियाच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे. सद्यपरिस्थित रिया चक्रवर्तीला या प्रकरणातील सगळ्यात महत्वाची व्यक्ती मानलं जात आहे. आता अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. मात्र बिहार पोलिसांनी अजुनही याबाबतची संपूर्ण माहिती दिलेली नाही. मुंबईत पोहोचलेल्या बिहार पोलिसांच्या स्पेशल टीमने देखील आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास नकार दिला आहे.

आता एकीकडे बिहार पोलिसांची ही स्पेशल टीम मुंबई पोलिसांसोबत काम करतेय तर तिकडे बिहारमध्ये देखील पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.सुशांतची बहीण मितू सिंहचा जबाब देखील नोंदवला जाणार आहे.रियाच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर मितूचा हा पहिला जबाब असेल जो या प्रकरणात खूप महत्वाचा मानला जाईल. याआधीही मुंबई पोलिसांनी मीतू सिंहची चौकशी केली आहे. त्यावेळी सुशांत आणि रियाच्या संबंधांवर देखील पोलिसांनी चौकशी केली होती. 

रिया चक्रवर्ती बद्दल बोलायचं झालं तर एफआयआर दाखल झाल्यानंतर अजुनतरी तिची कोणतीच प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र रिया तिच्या वकिलासोबत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करु शकते अशी माहिती मिळत आहे. मात्र सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने नुकतीच सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे. तिची ही पोस्ट चर्चेचा विषय बनतेय. रियाशी संबंधित ही पोस्ट असल्यांच म्हटलं जातंय कारण तिने या पोस्ट मध्ये म्हटलंय सत्याचा विजय होतो. त्यामुळे आता सुशांत आत्महत्या प्रकरणाबाबत सगळ्यांमध्येच काय होणार याची उत्सुकता आहे.     

sushant singh rajput case bihar police team reaches mumbai crime branch office  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput case bihar police team reaches mumbai crime branch office