आमीर खानसह 'या' बॉलीवूड कलाकारांच्या संपर्कात होती रिया चक्रवर्ती, कॉल डिटेल्समधून नवीन खुलासा

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 12 August 2020

ईडीने रियाचे दोन मोबाईल फोन, शौविक आणि इंद्रजीत यांचे एक एक मोबाईल फोन जप्त केले आहेत. यासोबतंच या तपासामध्ये रिया चक्रवर्तीचे कॉल रेकॉर्ड्सची माहिती समोर आली आहे.

मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर ईडीने रिया चक्रवर्ती, भाऊ शौविक चक्रवर्ती आणि वडिल इंद्रजीत चक्रवर्ती यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी केली आहे. ईडीने रियाचे दोन मोबाईल फोन, शौविक आणि इंद्रजीत यांचे एक एक मोबाईल फोन जप्त केले आहेत. यासोबतंच या तपासामध्ये रिया चक्रवर्तीचे कॉल रेकॉर्ड्सची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा: पारस-माहिराचा म्युझिक व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांना झाली बिग बॉसची आठवण

रिया चक्रवर्तीच्या कॉल रेकॉर्जमधून समोर आलं आहे की ती बॉलीवूडमधील अनेक नामवंत सेलिब्रिटींच्या संपर्कात होती. रियाच्या कॉल डिटेल्सनुसार आमीर खानसोबत तिचं बोलणं झालं होतं. रियाने आमीर खानला एकदाच कॉल केला होता तर आमीरने तिला ३ मेसेज पाठवले होते. यासोबतंच रियाच्या कॉल डिटेल्सच्या माहितीनुसार, आशिकी २ फेम आदीत्य रॉय कपूरला रियाने १६ कॉल केले होते तर आदित्यने तिला ७ वेळा फोन केला होता. रियाने अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ला देखील ३० वेळा कॉल केले होते तर रकुलने १४ वेळा तिला कॉलबॅक केला होता. 

रिया चक्रवर्तीने बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत देखील बातचीत केली आहे. रियाने श्रद्धाला ३ वेळा कॉल केला होता तर श्रद्धाने दोन वेळा तिला उत्तर दिलं होतं. सोनू के टीटू की स्वीटी फेम अभिनेता सनी सिंहला देखील रियाने सातवेळा फोन केला होता तर त्याने यापैकी ४ वेळा तिचा कॉल उचलला होता. इतकंच नाही तर साऊथ स्टार राणा दगुबट्टीसोबत देखील रियाची बातचीत झाली होती. रियाने राणाला ७ वेळा कॉल केला होता तर राणाकडून तिला ४ वेळा फोन आला होता.

सुशांतची तब्येत खराब असल्याकारणाने रिया सतत महेश भट्ट यांच्या संपर्कात होती. महेश भट्ट यांना रियाने ९ वेळा कॉल केला होता तर महेश यांच्याकडून रियाला ७ वेळा फोन करण्यात आला होता. रियाने सुशांतचं घर ८ जून ला सोडल्यानंतर ती सतत ६ दिवस दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या संपर्कात होती. रियाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर १३ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. न्यायालयाने हा निर्णय राखुन ठेवला आहे.   

sushant singh rajput case rhea chakraborty call record touch with several celebs  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput case rhea chakraborty call record touch with several celebs