
'दिल बेचारा' हा सुशांतने अभिनय केलेला शेवटचा चित्रपट आहे.
मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत य़ाच्या निधनाच्या दोन आठवड्यानंतर देखील देशभरात त्याची चर्चा थांबत नाहीये, अभिनेत्याने वायच्या अवघ्य 34 व्या वर्षी आत्महत्या करत आयुष्य संपवल्याने बॉलिवुड जगाला चांगलाच धक्का बसाला आहे. दरम्यान सुशांतचे जूने व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ समोर आला असुन यामध्ये सुशांत डांन्सर सुब्बालक्ष्मी यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहे.
प्रतिभावंत कलाकारांसाठी सुशांतच्या नावाने ट्रस्ट उभारणार; कुटूंबियांचा प्रेरणादायी निर्णय
हा व्हिडीओ सौभाग्य वेंकटेश यांनी इंस्टाग्राम वर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत सुशांत आनंदात डान्स करताना दिसत आहे. सांगण्यात येत आहे की हा व्हिडीओ सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' याच्या सेट वरील आहे. ज्यामध्ये प्रसिध्द डांन्सर सुब्बालक्ष्मी यांच्यासोबत डांन्स करताना सुशांत दिसत आहे. सुशांत 14 जून रोजी त्याच्या आपार्टमेंट मध्ये मृत अढळला होता त्यानंतर देशभरातील त्याच्या चहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुशांतचा 'दिल बेचारा' हा चित्रपट बनून तयार झाला आहे, त्याच्या निर्मात्यांनी सुशांतचा हा शेवटचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर 24 जूलै रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुकेश छाब्रा दिग्दर्शित ‘दिल बेचारा’ या चित्रपटात सुशांत मुख्य भूमिकेत आहे. तसेच अभिनेत्री संजना सांघी ही सुशांतसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. संजना या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.
entertainment