Sushant Singh Rajput Death Anniversary: भावाच्या आठवणीत सुशांतची बहिण व्याकूळ तर रियाला पोस्ट करणं पडलं महागात! पोस्ट व्हायरल

Sushant Singh Rajput Death Anniversary
Sushant Singh Rajput Death AnniversaryEsakal

Sushant Singh Rajput Death Anniversary: बॉलिवूडचा लोकप्रिय आणि टॅलेंटेड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आज या जगात नाही. पण तो त्याच्या चाहत्यांच्या हृदयात सदैव जिवंत आहे. आज सुशांतला जावुन 3 वर्षे पूर्ण झाली. आजच्या दिवशी 14 जून 2020 रोजी मुंबईतील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता.

तो आजही त्याच्या चाहत्यांच्या आठवणीत आहे. त्याच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्री हादरली. सुशांतचे चाहते पुन्हा एकदा त्यांच्या दिवंगत अभिनेत्याला सोशल मीडियावर भावनिक श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

Sushant Singh Rajput Death Anniversary
Sushant Singh Rajput Death Anniversary: कोडे सुटेना! तीन वर्ष झालीत तरीही न्याय मिळेना! चाहते अजूनही प्रतीक्षेत

यासोबतच सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंग कीर्ती आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांनी देखील सुशांतची आठवणीत पोस्ट शेयर केली आहे.

सुशांतच्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ, त्याची बहीण श्वेता सिंग कीर्तीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर त्याचे काही फोटो शेअर करत एक भावनिक नोट लिहिली. स्‍लाइडमध्‍ये स्‍क्रीनशॉट आहेत. ज्‍यामध्‍ये सुशांत त्‍याच्‍या आवडत्‍या पुस्‍तकांचे नाव सांगत आहेआणि चांगल्या पुस्‍तकांचे सल्लेही विचारत आहे.

Sushant Singh Rajput Death Anniversary
Ekta Kapoor Ban: कमळाच्या फूलात 'गंदी बात'! माता लक्ष्मीचा झाला अपमान...

पोस्टच्या कॅप्शनमध्ये श्वेता सिंह कीर्तीने लिहिले, "लव्ह यू भाऊ, आणि तुझ्या बुद्धिमत्तेला सलाम. मला तुझी आठवण येते प्रत्येक क्षणी.

पण मला माहित आहे की तू आता माझा एक भाग आहेस... तू माझ्या श्वासासारखा अविभाज्य झाला आहेस. "होय.

त्याची सुचवलेली काही पुस्तके शेअर करत आहे. आपण तेच होऊ या. #SushantIsAlive." यासोबतच तिने एक व्हिडिओ देखील शेयर केला आहे.

ज्यामध्ये तिने सुशांतच्या चाहत्यांना श्वेता पुढे म्हणाली- जर आपल्याला सुशांतला जिवंत ठेवायचे असेल आणि आपण त्याच्यावर खरोखर प्रेम करत असाल, तर तो जे होता ते आपण केले पाहिजे. त्यांची गुणवत्ता आपल्यात आणायची आहे. त्याच्या मनातील चांगुलपणा आणावा . मी माझ्या धाकट्या भावासाठी प्रार्थना करत आहे.

Sushant Singh Rajput Death Anniversary
Raj Thackeray Birthday: 'खासकरून हे वर्ष...' प्राजक्ता माळीच्या राज ठाकरेंना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!पोस्ट व्हायरल

यासोबत तिने बॉलिवूड अभिनेत्री आणि सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिनेही त्याची आठवण काढली आणि त्याच्यासोबतचा एक छोटा व्हिडिओ शेअर केला.

व्हिडिओमध्ये रिया आणि सुशांत लडाखच्या टेकड्यांमध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत. रियाने सुशांतला मागून मिठी मारली असून दोघेही खूप खुश दिसत आहेत.

मात्र, सुशांतचे चाहते त्याच्या पोस्टवर कमेंट करत आहेत आणि त्याच्यावर टीका करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com