''इतके'' तास अगोदरच झाला होता सुशांतचा मृत्यु : फॉरेंन्सिक रिपोर्टमधील खुलासा

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 6 October 2020

सुरुवातीला जो फॉरेंन्सिक रिपोर्ट प्रसिध्द करण्यात आला होता त्यात सुशांतच्या मृत्युच्या वेळेची नोंदच करण्यात आली नव्हती असा महत्वाचा मुद्दा समोर आला आहे. यानंतर या अहवालावरुन वादाला सुरुवात झाली. यामागे कुठले कट कारस्थान तर नाही ना असे प्रश्न अहवालाबाबत उपस्थित केले जात आहेत.  

मुंबई - सुशांत आत्महत्या प्रकरणाला अनेक प्रकारांमुळे वेगळे वळण लागत आहे. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या  फॉरेंन्सिक रिपोर्टनुसार काही महत्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत. त्या अहवालानुसार काही तास अगोदरच सुशांतचा मृत्यु झाला होता. असे म्हटले गेले आहे. दुसरीकडे याप्रकरणातील संशयित आरोपी असणा-या रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी आज संपणार आहे.

सुरुवातीला जो फॉरेंन्सिक रिपोर्ट प्रसिध्द करण्यात आला होता त्यात सुशांतच्या मृत्युच्या वेळेची नोंदच करण्यात आली नव्हती असा महत्वाचा मुद्दा समोर आला आहे. यानंतर या अहवालावरुन वादाला सुरुवात झाली. यामागे कुठले कट कारस्थान तर नाही ना असे प्रश्न अहवालाबाबत उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे या रिपोर्टवरुन एम्सने मुंबईच्या डॉक्टरांना विचारणा केली होती. आता सुशांतच्या फॉरेंन्सिक रिपोर्टवर वेगवेगळे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. जो फॉरेंन्सिक रिपोर्ट आला आहे त्यात सुशांतचा मृत्यु हा पोस्टमॉर्टेमच्या अगोदर दहा ते बारा तास झाली होती. पोस्टमॉर्टेम करणा-या कूपर रुग्णालयाने याबाबत अधिक माहिती दिली  आहे. सुशांतचा मृत्यु हा १४ जूनला ११ वाजता झाला होता.

शबाना आझमी यांनी कंगनावर साधला निशाणा, सांगितलं 'का करते सतत बडबड?'

यापूर्वी प्रसिध्द करण्यात आलेल्या पोस्टमार्टेमच्या रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्युची वेळ नोंदवली गेली नव्हती. यावरुन एम्सच्या टीमने मुंबईच्या डॉक्टरांना प्रश्न विचारले. आता सीबीआयने आपल्या तपासात या गोष्टींना महत्वाचे स्थान दिले असून हा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्ति हिने एका चॅनल दाखविण्यात आलेल्या बातमीचा स्क्रीन शॉट शेअर केला असून त्यावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. '' अशा प्रकारे तपास होत असल्यास काय बोलणार, हे सगळे काय चालले आहे ?''  तिने ''सुशांत कॉन्सिपीरन्सी एक्सपोस्ड, सुशांत एम्स टेप.'' असे हॅशटॅग केले आहे. 

संजय दत्तचा हॉस्पिटलमधून व्हायरल झाला 'हा' फोटो, संजूबाबाला अशा अवतारात पाहून चाहत्यांना बसला धक्का

 

  
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh Rajput Death Case turns new direction, now the forensic issue in front of media