सुशांतच्या आयुष्यात एक्स गर्लफ्रेंड अंकिताला होतं महत्वाचं स्थान, निर्मात्याने केला खुलासा

टीम ई सकाळ
Thursday, 18 June 2020

प्रसिद्ध टीव्ही निर्माता विकास गुप्ता याने सोशल मिडियावर सुशांतच्या आत्महत्येनंतर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने सुशांत आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे यांच्यामधील नात्याचा खुलासा केला आहे.

मुंबई- बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे सगळ्यांंनाच मोठा धक्का बसला आहे. सुशांतने रविवार १४ जुन रोजी बांद्रा येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. सुशांतच्या आत्महत्येवर इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा रंगताना दिसतायेत. प्रसिद्ध टीव्ही शो निर्माता विकास गुप्ता याने सुशांतशी संबंधित एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 

हे ही वाचा : तीन महिन्यांनतर जीममध्ये गेली सनी लिओनी, अशा अंदाजात केलं वर्कआऊट

प्रसिद्ध टीव्ही निर्माता विकास गुप्ता याने सोशल मिडियावर सुशांतच्या आत्महत्येनंतर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने सुशांत आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे यांच्यामधील नात्याचा खुलासा केला आहे. विकासने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुशांत, अंकिता लोखंडे, विकास गुप्ता यांच्यासोबत आणखी काही मित्र दिसून येत आहेत. हा फोटो सुशांत आणि अंकिता जेव्हा एकत्र काम करत होते तेव्हाचा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सुशांतच्या आयुष्यात अंकिताचं स्थान खुप महत्वाचं होतं असं या पोस्टमधून विकासने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. विकासने लिहिलंय, 'हा तो काळ होता जेव्हा सुशांत बिंधास्त आणि आनंदी असायचा. त्याला कशाचीही चिंता नव्हती. टीव्हीवरिल प्रसिद्ध आणि टीआरपीवर नंबर वन असलेला शो त्याने मध्येच सोडला होता. चहा-कॉफी घेता घेता तो सिनेमांचं प्लॅनिंग करायचा.

मला चांगलं आठवतयं, त्याने 'औरंगजेब' या सिनेमासाठी स्पष्ट नकार दिला होता. कारण त्याला मुख्य अभिनेत्याच्या भावाची भूमिका ऑफर झाली होती. तो एकदा म्हणाला होती की यशराज यांना नकार कसा देऊ तेव्हा फोटोत दिसणारी तरुणी (अंकिता लोखंडे) त्याला म्हणायची ज्यात तुला आनंद मिळेल तेच काम कर हे ऐकून सुशांत हसत होता.'

विकासने असंही म्हटलंय, 'मी त्याला कायम एका हसणा-या तरुणाच्या रुपात आठवू शकतो. तो नेहमी टेंशन फ्री राहायचा. कारण अंकिताला पाहून त्याचं टेंशन नाहीसं व्हायचं. अंकिता तु त्याची शॉक ऍब्जॉर्बर होतीस. त्याच्या चेह-यावर हसू येईपर्यंत तू त्याला सोडायची नाहीस.'

sushant singh rajput ex girlfriend ankita lokhande relationship explained in tv produsor vikas gupta post  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput ex girlfriend ankita lokhande relationship explained in tv produsor vikas gupta post