सुशांत सिंह राजपूतला बिहारच्या लोकांची अनोखी श्रद्धांजली, रस्ता आणि चौकला दिलं सुशांतचं नाव..

sushant
sushant

मुंबई- बिहारचा राहणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या चाहत्यांना त्याला विसरताच येत नाहीये. त्याच्या आठवणीत त्याचे चाहते दररोज काहीना काही करत आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात एकएक नवीन गोष्टी दररोज समोर येत असताना मात्र सुशांतचे चाहते त्यासाठी काहीतरी चांगलं करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला कशा वेगळ्या प्रकारे श्रद्धांजली देता येऊन त्यांचं प्रेम व्यक्त करु शकतील यासाठी ते प्रयत्नशील आहेत. याआधी सुशांतची खगोलशास्त्राची आवड पाहता त्याच्या चाहत्यांनी त्याच्या नावे एक तारा रजिस्टर केला होता आणि आता त्याच्या बिहारमधील लोकांनी रस्त्याला आणि चौकला सुशांतचं नाव दिलं आहे.

सुशांतचं बिहारमधील पूर्णिया येथील लोकांनी सुशांतच्या आठवणीत कित्येक दिवसांपासून रस्ता आणि चौकला त्याचं नाव देण्याची मागणी केली होती. यानंतर तेथील नगर निगमने फोर्ड कंपनी चौैकचं नाव बदलून सुशांत सिंह राजपूत चौक असं ठेवलं आहे. पूर्णियाच्या महापौर सविता देवी रस्ता आणि चौकचं उद्धाटन केलं. या दरम्यानचे फोटो सोशल मिडियावर आता व्हायरल होत आहेत.

महापौर सविता देवी सांगतात, 'सुशांत एक महान कलाकार होता. आणि त्याचं नाव रस्त्याला देणं ही त्याला श्रद्धांजली आहे. हा रस्ता मधुबनी पासून माता चौक पर्यंत जातो यालाच आता सुशांत सिंह राजपूत रोडच्या नावाने ओळखलं जाईल. इतकंच नाही तर प्रसिद्ध कार कंपनीच्या चौकचं नाव देखील बदलून सुशांत सिंह राजपूत चौक ठेवण्यात आलं आहे.'

विशेष म्हणजे बिहारची राजधानी असलेल्या पटनासोबतंच अनेक राज्यांमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आत्तापर्यंत ३० जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून त्याच्या आत्महत्येचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही.   

sushant singh rajput gets a road named after him in his hometown in bihar  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com