इरफान खानच्या निधनानंतर सुशांतला मिळाली होती 'ही' ऑफर..

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

मागील दोन महिन्यांमध्ये  बॉलीवूडला एका मागोमाग एक मोठे धक्के बसले . इरफान खानच्या निधनानंतर , ऋषी कपूर व त्यानंतर वाजीद खान , बासू चटर्जी व काल अचानक अनपेक्षितरित्या सुशांतची एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली.

मुंबई : मागील दोन महिन्यांमध्ये  बॉलीवूडला एका मागोमाग एक मोठे धक्के बसले . इरफान खानच्या निधनानंतर , ऋषी कपूर व त्यानंतर वाजीद खान , बासू चटर्जी व काल अचानक अनपेक्षितरित्या सुशांतची एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली.

दिग्दर्शक आनंद गांधी इमर्जेस नावाचा चित्रपट बनविणार आहेत आणि त्या चित्रपटामध्ये त्यांनी इरफान खानला घेतले होते. त्याच्या निधनानंतर त्यांनी सुशांतला घेण्याचे निश्चित केले होते. मात्र आता त्यांना जबरदस्त धक्का बसला आहे.

हेही वाचा: सुशांत सिंह राजपूत अनंतात विलीन; विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत झाले अंत्यसंस्कार..

“ शिप ऑफ थिसीस ” चे 2013 ला आनंद गांधी यांनी काम केल्यानंतर त्यांच्या नावाची मोठी चर्चा बॉलीवूडसह विविध देशांमध्ये होती. “ तुंबाड ”च्या लेखन व क्रियेटीव्ह डायरेक्टर म्हणूनही त्यांच्या नावाचा गाजावाजा झाला . त्यांनी त्यांच्या आगामी फिल्मचे नाव “ इमर्जेस ” ठेवले आहे . 

आनंद आणि सुशांत हे दीर्घ काळापासून मित्र होते . मात्र सुशांतच्या या अचानक जाण्याने ते कोलमडून गेले आहेत . इरफान व आता सुशांतच्या अकाली जाण्याने मला मानसिक धक्का बसला आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा: का..का..का..? सुशांत असं का केलंस?..अमिताभ बच्चन यांनी लिहिला ब्लाॅग...

 जवळपास पाच वर्षे आनंद यांनी या चित्रपटाच्या पटकथेवर काम केले आहे. आनंद यांनी सुशांतला याबद्दल सांगितले होते. याशिवाय अन्य चार अभिनेत्रींची निवड बाकी होती .आपल्या चित्रपटासाठी आनंद यांनी ऑस्ट्रेलियन अभिनेता ह्युगो व्हीविंगला निश्चित केले होते.

sushant singh rajput got film after irfaan khans incident 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput got film after irfaan khans incident