राजपूत आडनावाला सुशांत सिंगचा रामराम 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

भन्साळींवरील हल्ल्याचा निषेध 
मुंबई : चित्रपट दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्यावर राजपुतांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ एम. एस. धोनीफेम सुशांत सिंग राजपूतने ट्विटरवरून आपले आडनाव काढून टाकले आहे. 
जयपूरमध्ये "पद्मावती' चित्रपटाच्या सेटवर राजपूतांच्या "करणी सेने'ने धुमाकूळ घातला आणि भन्साळी यांच्यावर हल्ला केला. या घटनेचा निषेध अवध्या बॉलीवूडने केला; परंतु सुशांतने ट्विटरवरील आपल्या नावापुढचे आडनाव काढून निषेध केला. 

या संदर्भात सुशांतसिंगने ट्विटरवर म्हटले आहे की, "जोपर्यंत आपण आपल्या आडनावाला कवटाळून बसू तोपर्यंत आपल्याला हे सहन करावे लागेल. तुमच्यात हिंमत असेल, तर तुम्ही तुमच्या पहिल्या नावालाच तुमची ओळख बनवा. माणुसकी आणि प्रेमाहून कोणतीच जात मोठी नसते. धर्म आणि दयाच आपल्याला मोठे बनवते. 
भन्साळींनी "पद्मावती'चे चित्रीकरण जयपूरमध्ये न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Web Title: Sushant Singh Rajput reasons why he dropped his surname to protest against Padmavati attack on Sanjay Leela Bhansali