‘लक्ष्मीबॉम्ब’ बॅन करण्याची फॅन्सची मागणी; बॉलीवू़डची बाजु घेणे पडणार महागात

Laxmi Bomb Movie
Laxmi Bomb Movie

मुंबई - गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा अभिनेता अक्षय कुमार याने एका व्हिडीओच्या माध्यमातून बॉलीवूडमधील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले होते. तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. अनेकांनी अक्षयच्या म्हणण्याला दुजोरा दिला तर अनेकांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केलीय. पुढच्या महिन्यात त्याचा ‘लक्ष्मीबॉम्ब’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सुशांतच्या चाहत्यांनी विरोध केला आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या झालेल्या मृत्युमुळे अनेक वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. यासगळ्या प्रकरणामुळे बॉलीवूडला मोठ्या अडणीतून जावे लागत आहे. तसेच या घटनेने आम्हाला आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे दाखवून दिले आहे. असे अक्षय त्या व्हिडिओतून सांगत आहे. अशावेळी सध्या बॉलीवूडमधल्या ड्रग्ज प्रश्नाकडे त्याने लक्ष वेधले. तो म्हणतो, ड्रग्जची समस्या इंडस्ट्रीत अस्तित्त्वात नाही असे म्हणता येणार नाही. इंडस्ट्रीत ड्रग्जची समस्या आहे पण इंडस्ट्रीतल्या प्रत्येकाचा त्यात सहभाग आहे असं होऊ शकत नाही.  अशा अनेक गोष्टींवर बारकाईने विचार करावा लागेल हे यानिमित्ताने समोर आले आहे. बॉलीवूडमधील ड्रग्ज आणि अंमलीपदार्थांचे सेवन याबद्दल सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. ही एक मोठी समस्या आहे. यावर उपाय शोधावा लागणार आहे. यामुळे पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. यामध्ये अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. राघवा लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

चाहत्यांनी आम्हाला बनवले आहे. त्यांच्यामुळे आम्ही आहोत. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. फक्त आमची साथ सोडू नका. आम्हाला साथ द्या. ही तुम्हाला विनंती आहे. असे भावनिक आवाहन अक्षयने केले होते. मात्र सुशांतच्या चाहत्यांना अक्षयचे बोलणे फारसे न रुचल्याने त्यांनी त्याच्या नव्या येणा-या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सुरु केली आहे. 

प्रत्येक व्यवसायात वेगवेगळ्या प्रकारचे धोके आहेत. त्यात काही अनिष्ठ गोष्टीही असतात. याचा अर्थ त्या व्यवसायातील प्रत्येक व्यक्ती त्या संबंधित प्रकरणात सहभागी आहे असे म्हणता येणार नाही. ड्रग्ज याप्रकरणावर एनसीबी तसेच इतर जी तपासयंत्रणा काम करत आहे ती याचा सोक्षमोक्ष लावेल. यात शंका नाही.

बॉलीवूडमधील प्रत्येक कलाकार याप्रकरणात त्यांना सहकार्य करेल हे मी आपणास सांगतो. पण माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की, लोकांनी पुर्ण बॉलीवूडला बदनाम दुनियेच्या  या दृष्टिकोनातून पाहणे चूकीचे आहे. कृपया असे करु नका. हे बरोबर नाही. अशी भावना अक्षयने यावेळी व्यक्त केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com