'जख्म आसानी से नहीं भरते' सुशांतच्या बहिणीचे फॅन्सला पत्र

युगंधर ताजणे
Tuesday, 24 November 2020

  सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावर सीबीआयकडून तपास सुरु आहे. सुशांतची बहिण अजूनही त्या दु:खातून सावरली गेलेली नाही. ती म्हणते, माझ्यासाठी हे सगळं पचविणे कमालीचे अवघड आहे.

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविली. त्यानंतर बॉलीवूडमधले वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. त्या घटनेच्या तपासानेही अनेक वळणे घेतली. त्यातून काही बड्या कलाकारांची नावे समोर आली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी ते प्रकरण ड्रग्जच्या विळख्यात सापडले होते. अशा सगळ्या परिस्थितीत सुशांत सिंगच्या बहिण श्वेता सिंग कीर्तीने सोशल मीडियावर एक सुशांतच्या फॅन्ससाठी पत्र लिहिले आहे.

अद्याप सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावर सीबीआयकडून तपास सुरु आहे. सुशांतची बहिण अजूनही त्या दु:खातून सावरली गेलेली नाही. ती म्हणते, माझ्यासाठी हे सगळं पचविणे कमालीचे अवघड आहे. जेव्हा जेव्हा मी एखाद्या सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करते त्यावेळी मला ते अवघड वाटते. तेव्हा आणखी नवे एक दुखणे वाढलेले असते.अशावेळी काय करावे ते कळत नाही. परिस्थिती नियंत्रणात आणणे हे काही माझ्या हाती नाही. त्यामुळे सुशांतच्या जाण्याने जी काही जखम झालेली आहे ती वेळीच भरुन येणे अवघड आहे. यासाठी आपल्याला आणखी संयम ठेवण्याची गरज आहे.

तपासयंत्रणांनी जीवपाड मेहनत करुनही ते सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या मुळाशी गेलेले नाहीत. सा-या देशाचे याप्रकरणाकडे लक्ष लागले होते. यासगळ्या पार्श्वभूमीवर सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला लढा सुरू ठेवला आहे. वेळ जात असून अजूनही सुशांतच्या प्रकरणाला यश मिळालेले नाही ही गोष्ट त्याच्या फॅन्सला पटणारी नाही. याची जाणीव श्वेता सिंग यांना आहे. सुशांतशी जोडल्या गेलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे ही काही मिळाली नसल्याने ती मिळावीत अशी अपेक्षाही तिनं व्यक्त केली आहे.

हे ही वाचा: रामदास पाध्येंनी आदित्य रॉय कपूरसाठी बनवला ‘थ्रीडी बोलका बाहुला’    

श्वेता सिंह यांनी एक पत्र सुशांतच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेयर केले आहे. त्यातून त्यांनी आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, मी सध्या खूप वेगळ्या परिस्थितीतून जात आहे. ज्यावेळी एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करते तेव्हा मला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. अशावेळी आणखी एक नवीन दुखणे वाढलेले असते. तेव्हा पुन्हा त्याच जखमांना हात लावायला गेल्यास त्या आणखी चिघळतील. आणि त्यातून काही हाती लागणार नाही. असे वाटते.

'लग्नात जाण्यासाठी टॉप ५० मध्ये येणं जरुरी', सुनील ग्रोवरचं मजेशीर ट्विट

ज्या भावाबरोबर आपण आपल्या आयुष्यातील मोठा काळ व्यतीत केला तो आता माझ्याबरोबर नाहीये. या सत्याचा स्वीकार करुन मला पुढे जायला हवं. यासाठी माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. तो यातून काही मार्ग काढेल. अशी मला आशा आहे. अशी भावना श्वेता यांनी यावेळी व्यक्त केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant's sister Shweta Singh write letter related social-Sushant case she said pens gets more emotional