Rajeev Sen: 'ती ड्रामा क्वीन आहे, घटस्फोट हवा होता तर...' सुश्मिता सेनच्या भावाचा बायकोवर पलटवार

राजीव सेन आणि चारु असोपा काही दिवसांपूर्वी आपल्यातील वाद मिटवून मुलीसाठी एकत्र आले होते. पण आता पुन्हा एकदा चारु असोपानं घटस्फोटाची मागणी केली आहे.
Sushmita Sen brother rajeev sen opens up on charu asopa allegations know what he said
Sushmita Sen brother rajeev sen opens up on charu asopa allegations know what he saidGoogle

Rajeev Sen: सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि त्याची पत्नी अभिनेत्री चारु असोपा पुन्हा एकदा त्यांच्यातील वादांमुळे चर्चेत आले आहेत. राजीव सेन आणि चारु असोपाच्या घटस्फोटावरनं सुरु असलेल्या नाट्यामुळे लोक भलतेच कनफ्युज झाले आहेत. कधी दोघे क्षणात भांडतात,विभक्त होतात अन् लगेच एकत्र येऊन पुन्हा वेगळे होतात..गेल्या काही दिवसांपासून हे सुरू आहे. गणपतीच्या आगमनाच्या दिवशीच चारुने आपण राजीवशी असलेला वाद मिटवून पुन्हा एकत्र राहायचं ठरवलं असं पोस्टच्या माध्यमातून म्हटलं होतं. महिनाभर त्याला होत नाही तोवर चारूनं पुन्हा राजीवपासून विभक्त होण्याची घोषणा केली आहे. तिनं राजीव सेनवर गंभीर आरोप केले आहेत. चारुच्या या आरोपांवर आता राजीवनं चुप्पी तोडली आहे.(Sushmita Sen brother rajeev sen opens up on charu asopa allegations know what he said)

Sushmita Sen brother rajeev sen opens up on charu asopa allegations know what he said
Janhvi Kapoor: बोनी कपूरमुळे श्रीदेवीचा जीव होता धोक्यात..,जान्हवीनं सांगितलं शॉकिंग सीक्रेट

चारुने राजीव सेनवर आरोप केले होते की तो तिला मारायचा,शिवीगाळ करायचा आणि तिच्यावर संशय देखील घ्यायचा. चारू असं देखील म्हणाली की राजीवला दुसरी संधी दिल्याचा तिला पश्चाताप होतोय.चारुच्या आरोपांवर राजीव सेननं आता चुप्पी तोडली आहे. एका इंग्रजी वृत्त वाहिनीशी यासंदर्भात बोलताना राजीव म्हणाला की,''ती ड्रामा क्वीन आहे. सर्वात पहिली गोष्ट ही आहे की,जर तिला माझ्यापासून वेगळं व्हायचं आहे तर तिनं मला किंवा माझ्या कुटुंबातील कोणालातरी याविषयी सांगायला हवं. पण यासाठी मीडियाशी कशाला बोलायचं. ती नीट विचार करुन बोलणारी व्यक्तीच नाहीय''.

Sushmita Sen brother rajeev sen opens up on charu asopa allegations know what he said
अग्निहोत्रींचे नवे ट्वीट चर्चेत; म्हणाले,'जेव्हा प्रत्येक मुसलमान भारत माता की जय म्हणेल तेव्हाच...'

राजीव पुढे म्हणाला,''तिनं माझ्यावर खोटे आरोप लावले की मी तिला मारायचो,शिवीगाळ करायचो. पण मी कधी मीडियाजवळ गेलो नाही ती खोटं बोलत आहे हे सांगायला. मी फक्त तिच्या आरोपांचं उत्तर देताना माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. आता माझ्या मुलीच्या सुरक्षिते संदर्भात मला खूप भीती वाटतेय. कारण ती तिच्यासोबत आहे''.

राजीव पुढे हे देखील म्हणाला की,''माझ्या मुलीच्या सुरक्षेला लक्षात घेता मी आता योग्य ती अॅक्शन घेणार आहे. युट्युब व्हिडीओ आणि मीडियाच्या माध्यमातून आमचं वैयक्तिक आयुष्य तसंही सार्वजनिक झालं आहे. लोकांना कळतं कोण चुकीचं आहे आणि कोण बरोबर आहे. मी पण चारू आणि तिच्या कुटुंबाविषयी खूप काही सांगू शकतो.पण आजही त्यांच्या विरोधात न जाता त्यांचा सम्मान करतो आहे''.

Sushmita Sen brother rajeev sen opens up on charu asopa allegations know what he said
Riteish Deshmukh: 'वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण...', रितेशच्या पोस्टनं वेधलं लक्ष

चारूने राजीव सेनवर आरोप करताना म्हटलं होतं की,''लग्नानंतर आम्ही असा एक दिवस नसेल की भांडलो नसू. भांडणानंतर राजीव कधी आठवडाभर तर कधी महिनाभर पण गायब व्हायचा. तो साधा फोनही सुरू ठेवायचा नाही की त्याच्याशी कनेक्ट होता येईल. लॉकडाऊन आधी देखील राजीव तीन महिने चारूला सोडून गायब झाल्याचं तिनं म्हटलं होतं. शिविगाळ तर अनेकदा व्हायची आणि मारहाणही करायचा असं देखील चारु म्हणाली होती. राजीवला वाटायचं मी त्याच्याशी लबाडी करत आहे म्हणून तो हे सगळं करायचा''.

Sushmita Sen brother rajeev sen opens up on charu asopa allegations know what he said
Ram Setu: अक्षयवर प्रभूराम प्रसन्न! 'रामसेतू'नं पहिल्याच दिवशी कमावले इतके करोड...

राजीव सेन आणि चारू असोपा यांनी २०१९ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर काही दिवसांनीच त्यांच्या नात्यात तणाव सुरू झाला. कितीतरी वेळा दोघे विभक्त झाले अ्न पुन्हा एकत्र आले. आता पुन्हा एकदा चारू असोपानं आपण राजावला घटस्फोट देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com