सुष्मिताचा वहिनी टाकतेय गोंधळात; शेअर केलेल्या फोटोंवरून चाहते विचारताहेत प्रश्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushmita Sen Brother Rajeev Sen News

सुष्मिताचा वहिनी टाकतेय गोंधळात; शेअर केलेल्या फोटोंवरून चाहते विचारताहेत प्रश्न

Sushmita Sen Brother Rajeev Sen News सुष्मिता सेनचा (Sushmita Sen) भाऊ राजीव सेन आणि पत्नी चारू असोपा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. एवढेच नाही तर हे प्रकरण घटस्फोटापर्यंत (Divorce) पोहोचले आहे. दोघांनी एकमेकांवर अनेक आरोपही केले. परंतु, गणेशोत्सवानिमित्त चारूने फॅमिली फोटो शेअर करून चाहत्यांना गोंधळात टाकले आहे. शेअर केलेल्या फोटोत चारू ही राजीव सेन, मुलगी आणि सासूसोबत दिसत आहे. सर्व एकमेकांसोबत खूप खूश दिसत आहेत.

फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की चारू आणि राजीवने मुलीला पकडून ठेवले आहे. दोघेही तिचे चुंबन घेत आहेत. तर मुलगी हसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये राजीवने मुलीला धरले आहे आणि चारू बसलेली दिसेल. एका फोटोमध्ये चारू आणि राजीव एकत्र उभे आहेत. राजीवने चारूला मागून मिठी मारली आहे. फोटो शेअर करताना चारूने लिहिले ‘गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा’ असे लिहिले आहे.

राजीव सेन (Rajeev Sen) आणि चारू असोपा (Charu Asopa) यांना एकत्र पाहून काही चाहते खूश आहेत. चाहत्यांनी दोघांना एकत्र राहण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, काही युजर्सना दोघे एकत्र कसे आले हे समजत नाही आहे. एकाने लिहिले, काय गंमत सुरू आहे. कधी दोघे घटस्फोटाबद्दल (Divorce) बोलतात तर कधी एकत्र दिसतात. दुसऱ्याने लिहिले, असे दिसते की आम्हाला वेड्यात काढले जात आहे.

चारू आणि राजीव यांचे २०१९ साली लग्न झाले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुलगी जियानाचा जन्म झाला. अलीकडेच चारूने राजीवपासून विभक्त झाल्याबद्दल सांगितले होते. मला माहीत नाही की चमत्कार घडतो की नाही. मी माझे मन तयार केले आहे, असेही मुलाखतीत म्हटले होते.