परीक्षक सुश्‍मिता 

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

मिस युनिव्हर्स सुश्‍मिता सेन यंदाच्या मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेचं परीक्षण करणार आहे. तिने परीक्षकांच्या पॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी होकारही दिलाय. येत्या 30 जानेवारीला ही सौंदर्य स्पर्धा पार पडणार आहे. यंदाच्या या स्पर्धेत भारताकडून रोश्‍मिता हरिमूर्ती प्रतिनिधीत्व करणार आहे. मॉडेल ते अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या सुश्‍मिता सेनने 1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला होता. तिने तब्बल तेवीस वर्षांनंतर या सौंदर्य स्पर्धेत परीक्षकाच्या रूपात सामील होण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचं सांगितलं. याबाबत तिने इंस्टाग्रामवर लिहिलं की, मी पूर्णपणे तयार आहे.

मिस युनिव्हर्स सुश्‍मिता सेन यंदाच्या मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेचं परीक्षण करणार आहे. तिने परीक्षकांच्या पॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी होकारही दिलाय. येत्या 30 जानेवारीला ही सौंदर्य स्पर्धा पार पडणार आहे. यंदाच्या या स्पर्धेत भारताकडून रोश्‍मिता हरिमूर्ती प्रतिनिधीत्व करणार आहे. मॉडेल ते अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या सुश्‍मिता सेनने 1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला होता. तिने तब्बल तेवीस वर्षांनंतर या सौंदर्य स्पर्धेत परीक्षकाच्या रूपात सामील होण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचं सांगितलं. याबाबत तिने इंस्टाग्रामवर लिहिलं की, मी पूर्णपणे तयार आहे. मी अत्यंत उत्साही, भावूकपणे घरी परतल्यानंतर तेवीस वर्षांनंतर पुन्हा हा क्षण आला. 1994 मध्ये मनिला येथे "मिस युनिव्हर्स' होऊन मी परतले होते. मात्र आता मी 65व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेची परीक्षक म्हणून सहभागी होणार आहे. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. 

Web Title: sushmita sen miss universe judge