अभिनेत्री सुष्मिता सेन चार वर्ष 'या' आजाराने होती ग्रस्त, 'थकलेलं शरिर आणि...'

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

अभिनेत्री सुष्मिता सेनने तिच्या या आजारपणाविषयी स्वतः खुलासा केला आहे. सुष्मिताने तिच्या युट्युब चॅनलवर तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मिडियावर नेहमीच ऍक्टीव्ह असते. अनेकदा ती सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी शेअर करत असताना दिसून येते. सुष्मिता तिच्या चाहत्यांना फोटो आणि व्हिडिओ शेअर करत अपडेट ठेवत असते. याचदरम्यान सुष्मिता सेनने खुलासा केला आहे की ती सहा वर्षांपूर्वी एडिसन नावाच्या एका आजाराने ग्रस्त होती. या आजाराशी लढण्यासाठी तिने तिची जिद्द, चिकाटी पणाला लावली. इतकंच नाही तर एका खास वर्कआऊटच्या मदतीने तीने या आजारावर मात केली.

हे ही वाचा: सिनेमांमध्ये आईची भूमिका गाजवलेल्या रिमा लागू ख-या आयुष्यात होत्या 'सिंगल मदर' 

अभिनेत्री सुष्मिता सेनने तिच्या या आजारपणाविषयी स्वतः खुलासा केला आहे. सुष्मिताने तिच्या युट्युब चॅनलवर तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सुष्मिता सेन जिममध्ये नन चाक वर्कआऊट करताना दिसून येत आहे. युट्युबवर हा व्हिडिओ पोस्ट करत तिने भली मोठी पोस्ट देखील लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या एडिसन या आजाराविषयीचा खुलासा केला आहे. तिने सांगितलं की या आजारामुळे तीची रोगप्रतिकारक शक्ती खूपंच कमी झाली होती. 

सुष्मिताने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, 'मला सप्टेंबर २०१४मध्ये एक ऑटो इन्युन संबंधित आजाराविषयी कळालं ज्याचं नाव एडिसन असं होतं. याने मला हे जाणवलं की माझ्यात आता कोणतीही लढाई करण्याची ताकद उरलेली नाही. एक थकलेलं शरिर होतं जे निराशेने आणि रागाने भरलेलं होतं. माझ्या डोळ्या खाली काळी वर्तुळं तयार झाली होती.

मी त्या क्षणांविषयी शब्दात सांगू शकत नाही जेव्हा मी यातून बाहेर पडण्यासाठी चार वर्ष लढत राहिली. अनेक कठीण परिस्थितींनंतर मी माझं डोकं शांत केलं आणि स्वतःच्या शरिराला या आजाराविरोधात लढण्यासाठी तयार केलं. मी नन चाकवर लक्ष केंद्रित करुन माझ्यातल्या रागाला बाहेर काढलं. या आजाराविरोधात मी लढली आणि मग वेदना या माझ्यासाठी एका कलेप्रमाणे झाल्या. मी वेळेत ठीक झाले. २०१९ पर्यंत माझ्यातल्या ग्रंथी सक्रिय झाल्या. आता मला स्टेरॉईड आणि प्रतिकारक शक्तींचा काहीही त्रास नाही.'

सुष्मिताची ही पोस्ट सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.   

sushmita sen reveal she was diagnosed with addison disease and fight  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushmita sen reveal she was diagnosed with addison disease and fight