राणादाला बेदम मारहाण; सोडणार का मालिका?

hardik
hardik

प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील लोकप्रिय राणादा आता मालिकेत दिसणार की नाही यावर जोरदार चर्चा सुरू आहे. राणादाने काही दिवसांतच चाहत्यांची मने जिंकली होती. अंजली आणि राणादाची केमिस्ट्री लहान-थोरांपासून सगळ्यांनाच भावली होती, पण कालपासून मालिकेच्या सेटवरील काही फोटो व्हायरल झाल्यामुळे राणादा मालिकेतून बाहेर पडणार, मालिकाच बंद पडणार की आणखी काही होणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

राणादाला मारहाण करणारे काही फोटो काल सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावरून काहींनी त्याचा मृत्यू होणार असल्याचे तर्क मांडले, तर काहींनी ही मालिकाच बंद होत असल्याचे अंदाज मांडले. पण या दोन्ही गोष्टी प्रेक्षकांसाठी धक्कादायक ठरतील. त्यांच्या लाडक्या राणादा-पाठकबाईंची लव्हस्टोरी आता कितपत पुढे जाईल याबाबत काळजी व्यक्त केली जात आहे. जर राणादा म्हणजेच हार्दिक जोशी या मालिकेतून बाहेर पडला, तर त्याची जागा कोण घेईल? असाही प्रश्न चाहत्यांना पडलाय.

आता मालिका संपणार की हार्दिकने काही नवीन प्रॉजेक्ट हाती घेतले आहेत याबाबतही चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार आणि मालिका कोणत्या निर्णायक वळणावर येऊन थांबणार हे बघणे औत्सुक्याचे असेल.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com