Swara Bhaskar : प्रेग्नंट असतानाही नेटकऱ्यांचा स्वराला धर्मावरुन प्रश्न? 'आता तुझ्या मुलाचं नाव...!'

स्वरा ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी आणि वक्तव्यांसाठी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे.
Swara Bhaskar Flaunts Baby Bump
Swara Bhaskar Flaunts Baby Bump esakal

Swara Bhaskar Flaunts Baby Bump : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर ही आता तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. तिनं बेबी बंप फोटोशूट केलं आहे. मात्र ते फोटोशूट तिच्या काही चाहत्यांना आवडलेलं नाही. नेटकऱ्यांनी तर तिला तशा अवस्थेत असतानाही ट्रोल करणं सोडलेलं नाही.

स्वरा ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी आणि वक्तव्यांसाठी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. तिला कित्येकदा तिच्या परखड वक्तव्यांमुळे नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे. मात्र त्यांना जशास तसं उत्तर देत तिनं आपला करारीपणा दाखवून दिला आहे. स्वरानं फहाद अहमदशी लग्न केले होते. त्यानंतर स्वरा ट्रोल झाली होती. तिला तिच्या लग्नावरुन नेटकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

आता स्वराला नेटकऱ्यांनी बाळाचे नाव काय ठेवणार यावरुन डिवचण्यास सुरुवात केली आहे. अर्थात त्यावरुन स्वरानं कोणालाही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र स्वराच्या काही चाहत्यांनी ज्यांनी कुणी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिली आहे त्यांना चांगलेच सुनावले आहे. सध्या स्वराचे बेबी बंप फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.

नेटकऱ्यांनी केली आगपाखड...

स्वराच्या त्या फोटोंवर आता नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. तिच्यावर त्यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका नेटकऱ्यानं तिचा तो फोटो पाहिल्यावर म्हटले आहे की, आता तुझ्या मुलाचे नाव काय असणार अजय की आरिफ, दुसऱ्यानं लिहिलं आहे औरंगजेब, तिसऱ्यानं तर कहर करुन लिहिले आहे की, आता औरंगजेब येणार आहे. काहींनी मात्र स्वराचे कौतूक केले आहे.

स्वराच्या चाहत्यांनी ट्रोल करणाऱ्यांना खडसावले आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीला धर्माशी कसे काय जोडता, स्वराचा काय दोष आहे, तिला कोणत्या कारणासाठी ट्रोल केले जात आहे, ती प्रेग्नंट आहे. अशा स्थितीत आपण काय करतो आहोत याचे भान नेटकऱ्यांनी ठेवले पाहिजे. अशा प्रतिक्रिया त्या बेबी बंप च्या फोटोवरुन व्हायरल झाल्या आहेत. यापूर्वी देखील स्वरा तिच्या लग्नावरुन ट्रोल झाली होती. मात्र यासगळ्यात स्वरानं अद्याप नेटकऱ्यांना कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Swara Bhaskar Flaunts Baby Bump
OMG 2 Review: कांतीलाल आला 'त्या' विषयावर डोस देऊन गेला! भगवान शंकरही शॉक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com