Swara Bhasker
Swara BhaskerSakal

Swara Bhasker Video: स्वराला आठवतेय बॉलीवूडची दिवाळी पार्टी! मात्र आता लेकीमुळं...

Published on

Swara Bhasker Video: सध्या सर्वत्र दिवाळी सणाचा उत्साह दिसत आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडमधील सेलिब्रिटींना देखील दिवाळीचे वेध लागले आहेत. तर दुसरीकडे सेलिब्रिटीच्या घरी दिवाळी पार्टी सुरु झाली आहे.

मनीष मल्होत्राने याची सुरुवात केली आता रमेश तौरानीनेही त्याच्या घरी दिवाळीची पार्टी आयोजित केली होती. जिथे सर्व बॉलीवूड स्टार्सनी हजेरी लावली. मात्र या सर्वात एक अभिनेत्री गैरहजर राहिली ती म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर.

स्वरा भास्कर यंदाच्या दिवाळी पार्टीला मिस करत आहे. त्यामागे कारणही तसेच आहे. स्वराने या वर्षी सप्टेंबरमध्ये मुलीला जन्म दिला आहे. मुलीची काळजी घेण्यात व्यस्त असल्याने ती यंदाच्या दिवाळी पार्टीला जाऊ शकत नाही. त्यामुळे सध्या सोशल मिडियावर दिवाळी पार्टीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर स्वरा दिवाळी पार्टींना मिस करत आहे.

Swara Bhasker
Elvish Yadav Case: एल्विश यादव हाजिर हो! नोएडा पोलिसांनी केली 3 तास चौकशी; अडचणी वाढणार?

स्वरा भास्करने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने तिच्या जुन्या दिवाळी पार्टी लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. या व्हिडिओच्या सुरुवातीला ती तिच्या पायजमामध्ये मुलगी राबियाची काळजी घेताना दिसत आहे तर त्यानंतर तिचे मागील वर्षाचे काही दिवाळी लूक दाखवण्यात आले आहेत.

Swara Bhasker
Urfi Javed: फरार झालेली उर्फी सुवर्ण मंदिरात दिसली! संस्कारी लूक सोशल मिडियावर व्हायरल

हा व्हिडिओ शेअर करत स्वराने लिहिले की, मला दिवाळीच्या काळात FOMO होत आहे. यासोबतच स्वराने व्हिडीओमध्ये लिहिले, "आई झाल्यावर मला ते सगळे आठवते जेव्हा मी तयार होऊन वेगवेगळ्या ठिकाणी जायची."

सध्या स्वराचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर खुप व्हायरल होत आहे. स्वराचे चाहते तिच्या या व्हिडिओवर खूप कमेंट करत आहेत.

Swara Bhasker
Evan Ellingson: प्रसिद्ध अभिनेता इवान एलिंग्सनचा मृत्यू! 35व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

स्वरा भास्कर - फहाद यांनी लग्न केल्यानंतर 23 सप्टेंबर 2023 रोजी आपल्या पहिल्या मुलीचे स्वागत केले. स्वराने तिच्या लेकीचे नाव राबिया ठेवले आहे. तिचे अनेक फोटो स्वरा सोशल मीडियावर शेअर करत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com