Swatantrya Veer Savarkar Teaser: 'गांधी वाईट नव्हते मात्र..', वीर सावरकर जयंतीनिमित्त चित्रपटाचा टीझर रिलिज

SwatantryaVeer Savarkar Teaser
SwatantryaVeer Savarkar TeaserEsakal

SwatantryaVeer Savarkar Teaser: रणदीप हुड्डा यांनी वीर सावरकर यांच्या 140 व्या जयंतीनिमित्त 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. या माध्यामातुन रणदीप दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. तो चित्रपटात स्वातंत्र्यसैनिकाच्या भूमिकेत आहे.

टिझर शेयर करण्यासोबतच त्यांने लिहिले, "भारतातील सर्वात प्रभावशाली क्रांतिकारक, ज्यांना ब्रिटीश सत्ता घाबरत होती. त्याचा इतिहास कोणी मारला ते जाणून घ्या." या चित्रपटात रणदीप हुड्डा वीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे.

रणदीपने शेयर केलेल्या या टीझरमध्ये तो हुबेहूब वीर सावरकर दिसत आहे. इंग्रज अधिकारी त्याचा छळ करत आहे.

SwatantryaVeer Savarkar Teaser
Jacqueline Fernandez : 'सुकेशची नवरी आली..', डोक्यावर पदर घेवुन जॅकलिन पोहचली..नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

सावरकरांच्या भुमिकेत तो म्हणतो की, स्वात्रत्यांची लढाई ही 90 वर्ष चालली. हे युद्ध काहीच लोकांनी मिळून लढले..बाकी सारे तर केवळ सत्तेचे भुकेले होते. महात्मा गांधी वाईट नव्हते, पण त्यांच्यात अहिंसक विचार नसता तर भारताला ३५ वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळालं असतं, असेही या टीझरमध्ये सांगण्यात आले आहे. टीझरचा शेवट एका प्रश्नाने होतो... "Who killed his story?"

SwatantryaVeer Savarkar Teaser
Preity Zinta: आईच्या आग्रहास्तव प्रितीनं सुरु केला बारा ज्योतिर्लिंगांचा प्रवास! मात्र पुढं काही वेगळचं घडलं..

त्याचबरोबर कॅप्शनमध्ये त्याने चित्रपटाच्या रिलिज डेटचाही खुलासा केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट 2023 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

त्यांनी पुढे लिहिले की, "सावरकरांचा टीझर रिलीज झाला आहे." याशिवाय त्याने अनेक लोकांना टॅगही केले आहे.

उत्कर्ष नैथानीसोबत रणदीप हुड्डाने या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि सहलेखन केले आहे. स्वातंत्र्य वीर सावरकर या चित्रपटाचं शूटिंग जवळपास पूर्ण झाले असून, हा चित्रपट या वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

SwatantryaVeer Savarkar Teaser
The Kerala Story: 'आपल्या देशात खूप मूर्ख..', कमल हसनने केरळ स्टोरीला प्रोपगंडा म्हणताच दिग्दर्शक भडकले..

भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, खुदीराम यांसारख्या अनेक क्रांतिकारकांवर वीर सावरकरांच्या विचारसरणीचा प्रभाव असल्याचेही टीझरमध्ये सांगण्यात आले आहे.

वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीप हुड्डा यांनी खूप मेहनत घेतली आहे. या टीझर व्हिडिओ रिलिज होताच व्हायरल झाला आहे. नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com