The Kerala Story: 'आपल्या देशात खूप मूर्ख..', कमल हसनने केरळ स्टोरीला प्रोपगंडा म्हणताच दिग्दर्शक भडकले..

Kamal Haasan On The Kerala Story :
Kamal Haasan On The Kerala Story :Esakal

'द केरळ स्टोरी' या विपुल शाह निर्मित आणि सुदिप्तो सेनद्वारा दिग्दर्शित चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 5 मे ला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

केवळ मनोरजंन विश्वच नाही तर राजकिय विश्वातही याची बरिच चर्चा रंगली. केवळ 30 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटा 200 कोटींची कमाई केली आहे.

Kamal Haasan On The Kerala Story :
Sharat Saxena: आम्ही फक्त हिरोमागे.. शरत सक्सेना यांनी सांगितलं इंडस्ट्री सोडण्यामागचं दुःख

या चित्रपटावरुन बराच वाद रंगला. आता त्यातच आयफा पुरस्कार सोहळ्यात पत्रकारांशी संवाद साधताना अभिनेता आणि चित्रपट निर्माते कमल हसन यांनी 'द केरळ स्टोरी' हा प्रोपगंडा चित्रपट असल्याचं म्हटलं आणि एकच चर्चा रंगली.

ते म्हणाले, "मी प्रोपगंडा चित्रपटांच्या विरोधात आहे... टॅगलाइन देवुन कोणताही चित्रपट 'सत्यकथा' होत नाही. वास्तवात ती खरी असली पोहिजे आणि देशातील लोकांमध्ये फूट पाडणारे चित्रपट मला आवडत नाहीत.

त्याच्या या वक्तव्यामुळे पुन्हा द केरळ स्टोरी चर्चेत आली. आता त्यातच या चित्रपटाचे दिग्दर्शिक सुदीप्तो सेन यांनी आता कमल हसन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Kamal Haasan On The Kerala Story :
Akshay Kumar: आता तरी देवा मला पावशील का? केदारनाथनंतर अक्षय कुमार बद्रीनाथ मंदिरात! व्हिडिओ व्हायरल...

मिडिया रिपोर्टनुसार ते म्हणाले की, “मी अशा विधानांवर प्रतिक्रिया देत नाही. याआधी मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचो, पण आज मी तसं करत नाही.

कारण जे लोक या चित्रपटाला प्रोपगंडा चित्रपट म्हणायचे त्यांनी चित्रपट पाहिल्यानंतर त्यांची प्रशंसा केली. ज्यांनी तो पाहिलेला नाही ते या चित्रपटावर टीका करत आहेत. अशाच प्रकारे पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये तो प्रदर्शित झाला नाही.

या लोकांनी चित्रपट पाहिला नाही म्हणून त्यांना हा प्रोपगंडा आहे असं वाटतं. आपल्या देशात खूप मूर्ख स्टिरियोटाइप आहेत... आयुष्य नेहमीच काळे आणि पांढरे नसते, त्यात राखाडी रंगाच्या लाखो छटा त्यात असतात.

Kamal Haasan On The Kerala Story :
Raghav Chadha Nose Job: परिणीतीसाठी काय पण..! राघवचा लग्नासाठी आटापिटा! करावी लागली सर्जरी

काही दिवसांपुर्वी सुदीप्तो सेन यांची प्रकृती अचानक बिघडली होती, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 'द केरळ स्टोरी'मुळे सुदीप्तो सेन बऱ्याच दिवसांपासून व्यस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. व्यस्त वेळापत्रक आणि विश्रांतीचा अभाव यामुळे सुदीप्तो सेन यांची प्रकृती बिघडली होती पण आता ते ठिक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com