Jacqueline Fernandez : 'सुकेशची नवरी आली..', डोक्यावर पदर घेवुन जॅकलिन पोहचली..नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

Jacqueline Fernandez
Jacqueline FernandezEsakal

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचा प्रतिष्ठित असा आयफा अवॉर्ड शो मोठ्या उत्सहात सपन्न झाला. यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. प्रत्येकाने आपापल्या फॅशन स्टाइलने लोकांना मंत्रमुग्ध केले आहे.

बॉलिवूड दिवा जॅकलिन फर्नांडिसनेही ग्रीन कार्पेटवर तिचा फॅशन सेन्स दाखवला आहे. जॅकलिनचा हा लूक पाहून तिचे चाहते तिच्यावर फिदाच झाले.

Jacqueline Fernandez
Swara Bhaskar: आपण कोणासाठी मतदान केलंय बघा... स्वरा भास्करची मोदींवर जहरी टीका

जॅकलिन फर्नांडिसच्या आयफा लूकबद्दल बोलायचं झालं तर तिने फ्लॉई ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसला जोडून असलेली ओढणी तिने डोक्यावर लावली होती. जॅकलिनने तिच्या साध्या लूकने सर्वांनाच वेड लावले आहे. त्याच्या या लूकवर त्याच्या चाहत्यांनी त्याचे भरभरून कौतुक केले आहे.

Jacqueline Fernandez
The Kerala Story: 'आपल्या देशात खूप मूर्ख..', कमल हसनने केरळ स्टोरीला प्रोपगंडा म्हणताच दिग्दर्शक भडकले..

तिचे हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले. तिचा हा लूक चाहत्यांमध्ये चर्चेत आला. ज्यावर लोक जोरदार कमेंट करत आहेत.

काहींना तिचा हा लूक खुप आवडला. त्यांनी तिच कौतुक करत तिला गॉर्जियस, हॉट, ब्युटीफुल अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या या लूकवर लोक जोरदार कमेंट करत आहेत. तर काहींनी जॅकलिनला पाहून तिचा कथित बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखर आठवला.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा लूक पाहिल्यानंतर युजरने 'सुकेशची नवरी' अशी कमेंट केली. तर दुसऱ्याने 'सुकेशचा गिफ्ट केलेला ड्रेस' असं म्हणत तिची खिल्ली उडवली आहे. तर काहींनी सुकेशने हा शो देखील तुरुंगातुन नक्कीच पाहिला असेल अशी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

Jacqueline Fernandez
Akshay Kumar: आता तरी देवा मला पावशील का? केदारनाथनंतर अक्षय कुमार बद्रीनाथ मंदिरात! व्हिडिओ व्हायरल...

जॅकलिन फर्नांडिसचे नाव सुकेश चंद्रशेखर या ठगसोबत जोडलं गेलं होते . सुकेश चंद्रशेखर 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात तिहार तुरुंगात बंद आहे. सुकेश तुरुंगात असुनही तो जॅकलिनचा मागे आहे. तो तिच्यावर खुलेपणाने प्रेम व्यक्त केले आहे. इतकच नाही तर सुकेश जॅकलिनसाठी तुरुंगातुन प्रेमपत्रही पाठवत असतो.

जॅकलिनने आयफा स्टेजवर धमाकेदार डान्स केला. सिल्व्हर टू पीस ड्रेसमध्ये जॅकलीन अप्सरेपेक्षा कमी दिसत नव्हती. जॅकलिनने तिच्या किक चित्रपटातील जुम्मे की रात या गाण्यावर डान्स केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com