ए लिस्टर अॅक्ट्रेस.. इ का होता है?

taapsee pannu actress new movie esakal news
taapsee pannu actress new movie esakal news

मुंबई : आपल्या अभिनयाने तापसी पन्नूने आपलं वेगळं स्थान मिळवलं आहे. दक्षिणेतून आलेली ही पंजाबी मुलगी पिंक करता करता जुडवा 2 पर्यंत पोचली. पण आता असे वेगवेगळे सिनेमे देऊनही तिला एक प्रश्न मात्र सतावतो आहे. एका फॅशन डिझायनरच्या वक्तव्यामुळे हा प्रश्न तिला पडला आहे. 

याबाबत बोलताना तापसी म्हणाली, मला अजूनही प्रश्न आहे की ही ए लिस्टर अॅक्ट्रेस म्हणजे नेमकं काय? काही दिवसांपूर्वी एका फॅशन डिझायनरने बोलता बोलता सांगितलं की तापसी ही माझ्या शोची शो स्टाॅपर नसणार. कारण ती ए लिस्टर नाहीय. मला ए लिस्टर अॅक्ट्रेस हवी आहे. आता मला सांगा हा ए लिस्टर अॅक्ट्रेस म्हणजे नक्की काय.? मला ते अजून कळलेलं नाही. असा काही क्लब असेल तर त्याची प्रवेश परीक्षा द्यायलाही मी तयार आहे. फक्त मला या ए लिस्टरचा फाॅर्म्युला हवाय तो द्या.'

खरंतर, पिंक, बेबी, नाम शबाना आणि जुडवा 2 या चित्रपटांमुळे तापसी सतत चर्चेत आहे. अॅक्शन पॅक्ड सिनेमांसह आपण मसालेदार चित्रपटही करू शकतो हे तिने सिद्ध करून दाखवलं आहे. अर्थात असे सिनेमे करणं तिच्यासाठी नवं नाही. कारण दक्षिणेत तिला अशा सिनेमांनी मोठं यश मिळवून दिलं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com