तापसी की तो निकल पडी... 

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

"पिंक' गर्ल तापसी पन्नूची सध्या बॉलीवूडमध्ये इतर अभिनेत्रींपेक्षा जास्त चर्चा रंगली आहे. "पिंक'मधील तिच्या अदाकारीची सर्वांनीच दखल घेतली. नुकत्याच रिलीज झालेल्या "द गाझी अटॅक'मध्येही तिने उत्तम काम केलेय. चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. पुढील महिन्यातही ती जोरदार हिट देणार असे दिसतेय. "रनिंग शादी डॉट कॉम', "नाम शाबाना' आदी तिचे चित्रपट लागोपाठ प्रदर्शित होत आहेत. "पिंक'नंतर चर्चेत आलेली तापसी सध्या सगळ्या मोठ्या सेलिब्रेटी मॅगझिन्सच्या कव्हर पेजवर झळकतेय. प्रतिष्ठित अशा "मॅक्‍झिम' आणि "कॉस्मोपॉलिटन'सारख्या मॅगझिनच्या कव्हरपेजवर ती झळकली.

"पिंक' गर्ल तापसी पन्नूची सध्या बॉलीवूडमध्ये इतर अभिनेत्रींपेक्षा जास्त चर्चा रंगली आहे. "पिंक'मधील तिच्या अदाकारीची सर्वांनीच दखल घेतली. नुकत्याच रिलीज झालेल्या "द गाझी अटॅक'मध्येही तिने उत्तम काम केलेय. चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. पुढील महिन्यातही ती जोरदार हिट देणार असे दिसतेय. "रनिंग शादी डॉट कॉम', "नाम शाबाना' आदी तिचे चित्रपट लागोपाठ प्रदर्शित होत आहेत. "पिंक'नंतर चर्चेत आलेली तापसी सध्या सगळ्या मोठ्या सेलिब्रेटी मॅगझिन्सच्या कव्हर पेजवर झळकतेय. प्रतिष्ठित अशा "मॅक्‍झिम' आणि "कॉस्मोपॉलिटन'सारख्या मॅगझिनच्या कव्हरपेजवर ती झळकली. "एफएचएम' मॅगझिनच्या कव्हरपेजवर ती अगदी पिंक रंगाच्या कपड्यातच झळकली आहे. ती आता साधीसुधी अभिनेत्री राहिलेली नसून स्टारडमच्या दिशेने तिची वाटचाल सुरू आहे. तापसीची घोडदौड पाहता लवकरच ती स्टारडमच्या शिखरावर पोहोचणार यात शंका नाही. तापसी की तो निकल पडी... असेच म्हणावे लागेल. 

Web Title: taapsee pannu bollywood success

टॅग्स