esakal | अभिनेत्री तापसी पन्नुचं मुलींच्या शिक्षणासाठी 'नन्ही कली' अभियान
sakal

बोलून बातमी शोधा

tapsee

फॅनकाईंड ही स्वयंसेवी संस्था आणी तापसी यांनी एकत्र येऊन 'नन्ही कली' हे अभियान पुढे न्यायचं ठरवलं आहे.

अभिनेत्री तापसी पन्नुचं मुलींच्या शिक्षणासाठी 'नन्ही कली' अभियान

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई-  अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माणे केली आहे. तापसी अनेक सामाजिक कार्यांमध्ये देखील भाग घेत असते. आता तापसी देशातील गरीब आणि गरजू मुलींच्या शिक्षणासाठी नन्ही कली अभियानात सहभागी झाली आहे. अंशुला कपूर यांची फॅनकाईंड ही स्वयंसेवी संस्था आणी तापसी यांनी एकत्र येऊन 'नन्ही कली' हे अभियान पुढे न्यायचं ठरवलं आहे. मुलींच्या शिक्षणासाठी देणगी देणाऱ्या पाच चाहत्यांना तापसी क्हर्च्युअली भेटणार आहे.

हे ही वाचा: 'केजीएफ 2' च्या टिझरची प्रतीक्षा संपली, सुपरस्टार यश देणार चाहत्यांना सरप्राईज    

तापसीने याआधीही नन्ही कली या अभियानासाठी काम केलेलं आहे. यातून मुलींशी आणि चाहत्यांशी संवाद साधण्याची संधी तिला मिळाली आहे. 7 ते 21 डिसेंबर दरम्यान हे अभियान सुरू राहील. याविषयी अधिक माहिती देताना तापसी सांगते, 'तुम्ही जर पुरुषाला शिकवलं तर तो एकटाच शिकतो. पण एक स्त्री शिकली तर ती अवघ्या घराला, राष्ट्राला शिकवते. एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. नन्ही कली माझ्या खूप जवळची आहे. म्हणूनच माझ्या सर्व चाहत्यांना मी आवाहन करते की त्यांनी या अभियानासाठी सढळ हस्ते देणगी द्यावी.'

'नन्ही कली' हे अभियान 1996 साली उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सुरू केलं होतं. गरीब कुटुंबातील मुलींना दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत करणे, हा या मोहिमेचा हेतू आहे. देशातील महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण अनुक्रमे शहरी आणि ग्रामीण भागात 65 टक्के आणि 46 टक्के एवढे आहे. मुलगी शिकली प्रगती झाली हे तत्व या माध्यमातून देशासमोर येणार आहे. देशातील वेगवेगळ्या भागातील गरजु मुलींचा यात समावेश असेल. 

taapsee pannu joins hands with nanhi kali for the education of underprivileged girls