esakal | 'जुने चेहरे, नवी सुरुवात'; 'द कपिल शर्मा शो' पुन्हा येतोय
sakal

बोलून बातमी शोधा

kapil sharma show

'जुने चेहरे, नवी सुरुवात'; 'द कपिल शर्मा शो' पुन्हा येतोय

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - लोकप्रियतेचं शिखर गाठलेला शो म्हणून कपिल शो प्रसिद्ध (the kapil sharma show) आहे. त्याचा शो केवळ भारतातच नाही तर जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये पाहिला जातो. आता तो शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा शो बंद होता. कोरोनामुळे शो च्या चित्रिकरणावर मर्यादा होत्या. कपिलनं सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेयर करुन माहिती दिली आहे. कपिलच्या शो मधील एक महत्वाची पात्र होतं ते म्हणजे डॉ. मशहूर गुलाटी. ती भूमिका सुनील ग्रोव्हर (sunil grover) साकारत होता. मात्र कपिलबरोबर झालेल्या वादामुळे त्यानं हा शो सोड़ला. ( the kapil sharma show back releasing soon kapil shared post yst88)

कपिलच्या शो चा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते त्याच्या या मालिकेची आतूरतेनं वाट पाहत आहे. दीड वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरु आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम मनोरंजन क्षेत्रावरही झाला आहे. अनेक मालिकांचे चित्रिकरण बंद होते. त्यामुळे निर्मात्यांनी रिपिट टेलिकास्टवर भर दिला होता. अशा परिस्थितीत अनेक सेलिब्रेटींना आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागल्याचेही दिसून आले आहे. थोड्याच दिवसांत द कपिल शर्मा शोचं टेलिकास्ट होणार आहे.

कपिलनं आपल्या इंस्टाच्या अकाऊंटवरुन एक फोटो शेयर केला आहे. त्या फोटोमध्ये त्याची टीम आहे. भारती सिंग, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, सिमोना या कार्यक्रमाचा भाग होते. ते या फोटोमध्ये दिसत आहेत. कपिलनं त्या फोटोला कॅप्शन दिली आहे, त्यानं लिहिलं आहे की, पुन्हा एकदा नवीन सुरुवात. जून्या चेहऱ्यांना घेऊन पुन्हा नव्यानं सुरुवात. त्याच्या या कॅप्शनला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स दिल्या आहेत.

हेही वाचा: तो फोटो अमिताभ यांचा नाहीच, नेटकरी म्हणाले 'हा तर...'

हेही वाचा: 'दिल्ली क्राईम' फेम शेफालीचं 'हॅप्पी बर्थडे मम्मीजी' पोस्टर व्हायरल

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 21 ऑगस्टपासून हा शो टेलिकास्ट होणार असल्याची चर्चा आहे. देशभरात कॉमेडियन कपिल शर्मा शोचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. आपल्या वेगळेपणामुळे या शो नं प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. अशीही चर्चा आहे की, या शो च्या नव्या सीझनसाठी कपिलनं फी वाढवून घेतली आहे.

loading image