
तापसी पन्नू लवकरच ‘रश्मी रॉकेट’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तापसी या सिनेमातील भूमिकेसाठी तयारी करतेय.
मुंबई- आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच ‘रश्मी रॉकेट’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तापसी या सिनेमातील भूमिकेसाठी तयारी करतेय. नुकताच तिने रश्मी रॉकेट' या सिनेमातील तिचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
हे ही वाचा: जर अभिषेक 'बच्चन' नसता म्हणणा-या ट्रोलरला अभिषेकनेचं केलं ट्रोल
आकाश खुराना दिग्दर्शित 'रश्मी रॉकेट' या सिनेमात तापसी एका धावपटूची भूमिका साकारतेय. सध्या दुबईत या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. या भूमिकेसाठी तापसी खूप मेहनत घेत असून सेटवरही तिच्यासोबत पाच आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, ट्रॅक ट्रेनर, ऍथलेटिक्स कोच आणि जिम ट्रेनर अशी टीम असते. या फर्स्ट लूकमध्ये तापसी रनिंग ट्रॅकवर पाठमोरी उभी आहे. आपल्या जिद्दीच्या व मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणाऱ्या एका धावपटूची भूमिका ती साकारतेय.
तापसीच्या हातात सध्या बरेच प्रोजेक्ट्स असून नुकतंच तिने आनंद एल राय दिग्दर्शित ‘हसीन दिलरुबा’ या रोमॅण्टिक थ्रिलर सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलंय. त्यानंतर ती ‘लूप लपेटा’, ‘रन लोला रन’ या सिनेमांमध्येही झळकणार आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘थप्पड’ या सिनेमातील तिच्या भूमिकेचं प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक झालं होतं. तेव्हापासून प्रेक्षक तिच्या आगामी सिनेमाची वाट पाहत होते.
taapsee pannu shares first look from rashmi rocket