
अभिनेत्री जेनीफर मिस्त्री हिचं इन्स्ट्राग्राम अकाउंट हॅक झालं आहे. याबाबत तिने सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.
मुंबई- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध कॉमेडी मालिकेत रोशन सोधी ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री जेनीफर मिस्त्री हिचं इन्स्ट्राग्राम अकाउंट हॅक झालं आहे. याबाबत तिने सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान अभिनेत्री अंबिका रंजनकर हिने जेनीफरचं अकाउंट हॅक झाल्याबाबतची माहिती चाहत्यांना दिली आहे.
हे ही वाचा: गरजूंना मदत करण्यासाठी सोनू सुदने गहाण ठेवली स्वतःची एवढी मालमत्ता
“जेनीफरचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झालं आहे. जर कुठल्या अज्ञात अकाउंटवरुन तुम्हाला मेसेज किंवा रिक्वेस्ट आली तर त्याकडे दुर्लक्ष करा. जेनीफर आपलं अकाउंट पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मी चाहत्यांना विनंती करतेय की त्यांनी देखील देवाकडे प्रार्थना करावी.” अशी इन्स्टाग्राम पोस्ट लिहून अंबिकानं हॅकर्सपासून सावधान राहण्याचा सल्ला प्रेक्षकांना दिला आहे. तिची ही पोस्ट सध्या सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे.
अंबिका रंजनकर ही तारक मेहता मालिकेत कोमल हाथी ही व्यक्तिरेखा साकारते. आपल्या हटके अभिनय शैलीच्या जोरावर गेली १२ वर्ष ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अंबिका सोशल मीडियावर देखील चांगलीच ऍक्टीव्ह असते. फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. यावेळी तिने मालिकेतील कोस्टार जेनीफरच्या वतीनं चाहत्यांशी संपर्क साधला.
taarak mehta ka ooltah chashmah actress jennifer mistry bansiwal instagram account gets hacked