भिडे गुरूजी सोनूचा व्हिडिओ बघितला का? २०२१ चे मानले आभार

नेहमी चर्चेत असलेल्या सोनूचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे
Nidhi Bhanushali
Nidhi BhanushaliNidhi Bhanushali

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका पाहणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. अनेक वर्षे झाले तरी मालिकेचा टीआरपी कायमच आहे. लहान असो किंवा वयोवृद्ध प्रत्येकजण ही मालिका पाहत असतो. यातील प्रत्येक पात्र विशेष आहे. भिडे मास्तर या मालिकेतील विशेष पात्रांपैकी एक आहे. भिडेंना सोनू (Sonu Bhide) नावाची मुलगी आहे. मालिकेत आधी निधी भानुशालीने (Nidhi Bhanushali) सोनूची भूमिका साकारत होती. आता तिचा बिकिनी व्हिडिओ व्हायरल (video viral) झाला आहे.

निधी (Nidhi Bhanushali) सोशल मीडियावर नेहमी बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करीत असते. तिचे लाखो फॉलोअर्स पोस्टची वाट बघत असतात. मालिका सोडल्यानंतरही निधीला तिचे चाहते सोनू (Sonu Bhide) नावानेच ओळखतात. यामुळेच की काय ती नेहमी चर्चेत असते. २०२१ वर्षाच्या सरत्याकाळात निधीने बोल्ड बिकिनी लूक शेअर केला आहे. व्हिडिओ (video viral) शेअर करताना ‘Glimpse of 2021’ अशी पोस्ट टाकली आहे.

नेहमी चर्चेत असलेल्या सोनूचा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तिने २०२१ मध्ये केलेल्या प्रवास दाखवला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला बिकिनीमध्ये नदीत पोहताना दिसत आहे. सरते वर्षे निधीसाठी खास ठरले आहे.

Nidhi Bhanushali
३१ डिसेंबरपासून आठवीपर्यंतच्या शाळा बंद; हिवाळी सुट्ट्या जाहीर

२०२१ या वर्षाने खूप काही दिले. माझा पहिली सिनेमा, पहिली कार, पहिला कॅमेरा, बराच काळ घरापासून दूर राहणे, पहिल्यांदा कुत्रा चावला, पहिल्यांदाच अनेक गोष्टी मी यावर्षी केल्याचे तिने व्हिडिओतून सांगितले आहे. या सगळ्यांबद्दल तिने आभारही मानले आहे. तिच्या व्हिडिओवर (video viral) चाहते प्रतिक्रिया देत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com