Taarak Mehta:'शैलेश लोढांना कोण करणार रीप्लेस?'; निर्माते म्हणाले,'मी स्वतः...' Taarak Mehta | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Taarak Mehta Ka ooltah chashmah producer asit modi reveals no one replace shailesh lodha.

Taarak Mehta:'शैलेश लोढांना कोण करणार रीप्लेस?';निर्माते म्हणाले,'मी स्वतः...'

Taarak mehta Ka Ooltah Chashmah: गोकुळधाम सोसायटीचे 'तारक मेहता' गेल्या काही दिवसांपासून गायब आहेत. मध्ये बातमी होती की शो ला नवीन तारक मेहता सापडले. शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांची रीप्लेसमेंट असित मोदी यांनी शोधली आहे. निर्मात्यांनी जैनीराज राजपुरोहित यांची तारक मेहताच्या भूमिकेसाठी निवड केल्याचं बोललं जात होतं. पण यात काहीच तथ्य नसल्याचं आता समोर येत आहे. स्वतः निर्माते असित मोदी(Asit Modi) यांनी यावरनं पडदा उठवला आहे. चला जाणून घेऊया काय आहे पूर्ण प्रकरण..(Taarak Mehta Ka ooltah chashmah producer asit modi reveals no one replace shailesh lodha).

हेही वाचा: Don 3: प्रियंकाचा पत्ता कट,'ही' मराठमोळी अभिनेत्री बनणार शाहरुखची रोमा?

काही मीडिया रिपोर्ट्समधून दावा केला जात होता की, अभिनेता जैनीराज राजपुरोहित यांना 'तारक मेहता' मालिकेतील शैलेश लोढा यांनी साकारलेल्या तारक मेहता या टायटल रोलसाठी निवडलं गेलंय. पण आता मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी समोर येऊन याला स्पष्ट नकार दिला आहे. ''शैलेश लोढा यांच्या जागी कोणाचीच निवड झालेली नाही असं निर्मात्यांनी सांगितलं आहे. जशी निवड होईल,मी स्वतः सगळ्यांना सांगेन'', असं ते म्हणालेत. सध्यातरी आम्ही कोणाचीच निवड केलेली नाही.

हेही वाचा: 'कुछ बातें करने का मन करता है...',बॉयकॉट ट्रेन्डवर आता अमिताभनी ओढले ताशेरे

जैनीराज राजपुरोहित यांनी खूप मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी 'बालिका वधु', 'लागी तुझसे लगन',' मिले जब हम तुम..'अशा अनेक चर्चेतील मालिकांमधनं अभिनय साकारला आहे. एवढंच नाही तर त्यांनी सिनेमातूनही भूमिका साकारल्या आहेत. अक्षय कुमारच्या 'ओह माय गॉड','सलाम वॅंकी' सारख्या सिनेमातून ते दिसले आहेत. लोकांमध्ये ते बरेच पॉप्युलर देखील आहेत. कॉमेडीमध्ये तर ते शेर आहेत असं म्हटलं जातं. त्यांच्या अभिनयाचे आणि हावभावाचे अनेक लोक फॅन्स आहेत.

असित मोदी आणि शैलेश लोढा यांच्यामध्ये सध्या धुसफुस सुरू आहे,आणि ती काही लपून राहिलेली नाही. पण शैलेश लोढा हेच नेहमी तारक मेहता भूमिकेसाठी निर्मात्यांची पहिली पसंत राहिले आहेत. १४ वर्षानंतर मालिकेला सोडण्याचा त्यांचा निर्णय कोणाच्याच पचनी पडत नाहीय. सगळेच त्यांना मिस करत आहेत. पण आता असंही कळतंय की शैलेश लोढा केव्हाच शो मध्ये परतणार नाहीत. कारण त्यांना आता काहीतरी नवं करायचं आहे आणि तशी त्यांनी सुरुवात देखील केली आहे. पण असित मोदींना अजूनही शैलेश लोढा परततील असं वाटतंय. ते त्यांच्या वाटेकडेच डोळे लावून बसलेयत. आणि म्हणूनच त्यांना लोढांची रीप्लेसमेंट शोधायला वेळ लागतोय असं देखील बोललं जात आहे.

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Producer Asit Modi Reveals No One Replace Shailesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Tv Entertainment News