'तारक मेहता..'मधील 'टप्पू'च्या वडिलांचं कोरोनाने निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavya Gandhi

'तारक मेहता..'मधील 'टप्पू'च्या वडिलांचं कोरोनाने निधन

'तारक मेहता का उल्टा चष्मा' Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या मालिकेत 'टप्पू'ची Tapu भूमिका साकारलेला अभिनेता भव्य गांधी Bhavya Gandhi याच्या वडिलांचं कोरोनाने निधन झालं. गेल्या दहा दिवसांपासून ते रुग्णालयात कोरोनाशी झुंज होते. अखेरच्या दिवसांत त्यांची तब्येत ढासळल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. भव्यचे वडील विनोद गांधी हे बांधकाम व्यावसायिक होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Tapu aka Bhavya Gandhi father passes away due to COVID 19)

विनोद गांधी यांच्या पश्चात त्यांची पत्नी यशोदा आणि निश्चित, भव्य ही दोन मुलं असा परिवार आहे. भव्यच्या वडिलांच्या निधनाच्या वृत्ताने त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोन दिवसांपूर्वी 'तारक मेहता..'मध्ये गोगीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता समय शाहच्या बहिणीचं लग्न झालं. वडिलांच्या प्रकृतीमुळे भव्यने व्हिडीओ कॉलद्वारे या लग्नाला हजेरी लावली होती.

हेही वाचा : 'गाढवांनो, मूर्खांनो..'; ट्रोलर्सना सुनावताना ढासळला सोनू निगमचा तोल

भव्यने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत बरीच वर्षे तिपेंद्र लाल गडा ऊर्फ टप्पूची भूमिका साकारली होती. २०१७ मध्ये या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर तो काही गुजराती चित्रपटांमध्ये काम करत होता. जवळपास नऊ वर्षे भव्यने 'तारक मेहता..'मध्ये काम केलं. मालिका सोडल्यानंतरही त्याची सहकलाकारांसोबत मैत्री कायम आहे. दिशा वकानी, दिलीप जोशी, समय शाह यांच्या संपर्कात तो कायम असतो.

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Tapu Aka Bhavya Gandhi Father Passes Away Due To Covid

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :covid 19
go to top