हास्याचा डबल डोस! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात 'तारक मेहता..'ची टीम

comedy show
comedy show

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे आणि या कार्यक्रमाचे आता ३०० भाग पूर्ण होत आहेत. गेल्या अडीच वर्षात या कार्यक्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. हसणं हा सगळ्यावरचा रामबाण उपाय आहे असं म्हटलं जातं. नवनवीन संकल्पना, प्रेक्षकांना आपलेसे वाटणारे विषय, भन्नाट टाईमिंग, हवीहवीशी वाटणारी पात्रं आणि कमाल विनोद या सगळ्यांचा मिलाफ या कार्यक्रमात पाहायला मिळाला. आता या कार्यक्रमात छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील कलाकार हजेरी लावणार आहेत. 

३०० नाबाद भागांचा एक सुंदर सोहळा प्रेक्षकांना येत्या १७ आणि १८ फेब्रुवारीला पाहायला मिळणार आहे. 'तारक मेहता..'मधील जेठालाल, भिडे, पोपटलाल, माधवी भाभी, कोमल भाभी आणि मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी हे ३०० नाबादच्या या सोहळ्याला हजर राहणार आहेत. "अनेक वर्षांनी इतकं हसलो," अशी प्रतिक्रिया यावेळी मालिकेत आत्माराम भिडेंची भूमिका साकारणाऱ्या मंदार चांदवडेकर यांनी दिली. तर इथली सर्व ऊर्जा घेऊन आम्ही आमच्या मालिकेतही ती आणण्याचा प्रयत्न करू असं मालिकेचे निर्माते असित कुमार म्हणाले.

या कार्यक्रमातील काही गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आणि प्रसिद्धही झाल्या. प्राजक्ता माळीचं खुसखुशीत निवेदन, सई ताम्हणकरने कलाकारांना दिलेली दाद आणि प्रसाद ओकची मार्मिक टिप्पणी या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य ठरले. विनोदाची पातळी राखून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्याचं शिवधनुष्य हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमने लीलया पेललं आहे. हा विनोदाचा सोहळा १७ आणि १८ फेब्रुवारीला रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com