Munmun Dutta: तारक मेहताच्या 'बबिता' फेम मुनमुनचा अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Munmun Dutta

Munmun Dutta: तारक मेहताच्या 'बबिता' फेम मुनमुनचा अपघात

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Babita ji Munmun Dutta Accident: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये सर्वाधिक प्रसिद्ध आणि चर्चेत असणारी मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. गेल्या दीड दशकांहून अधिक काळ या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. त्या मालिकेतील कित्येक पात्रं ही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. त्यातच बबिता फेम मुनमुन दत्ताला अपघात झाल्याची बातमी व्हायरल झाली आहे.

मुनमुनची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकरी आणि चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी तारक मेहतामध्ये जेठालाल यांचे वडील चंपक चाचाची भूमिका करणाऱ्या अमित भट्ट यांना देखील अपघात झाला होता. त्यानंतर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती.त्यानंतर आता मुनमुन दत्तानं दिलेल्या धक्कादायक बातमीनं चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. चाहत्यांना देवाचा धावा सुरु केला आहे.

मुनमुन ही गेल्या काही दिवसांपासून युरोपच्या दौऱ्यावर आहे. त्यात जर्मनीमध्ये असताना तिला अपघात झाल्याची बातमी व्हायरल झाली आहे. मुनमुनने इंस्टावरुन एक स्टोरी शेयर केली आहे. तिच्या पायाला दुखापत झाली आहे. तिनं चाहत्यांना काळजी न करु नका. आपण सुखरुप असल्याचे म्हटले आहे. मला दुखापत झाल्यानं दौरा अर्धवट सोडावा लागत असल्याचे मुनमुननं म्हटले आहे.

Munmun Dutta

Munmun Dutta

हेही वाचा: Shreya Ghoshal: श्रेया घोषालचा आवाज गेला? पोस्टनं चाहत्यांना बसला धक्का

दोन दिवसांपूर्वी मुनमुन जर्मनीमध्ये गेली होती. त्यावेळी तिला अपघात झाल्याचे दिसून आले. ती जेव्हा स्वित्झर्लंडमध्ये गेली तेव्हा तिनं काही फोटोही शेयर केले होते. आता तिच्या अपघाताच्या बातमीनं चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

हेही वाचा: Ranveer Singh: 'अरे मी रणवीर सिंग, पत्रकार म्हणतो, ओळखत नाही'