Video : 'तारक मेहता'मधील सोनूचा बिकिनी लूक; चाहते म्हणाले..

निधीच्या व्हिडीओला दीड लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.
Nidhi Bhanushali
Nidhi Bhanushali

'तारक मेहता का उल्टा चष्मा' Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या लोकप्रिय मालिकेत सोनालिका ऊर्फ सोनूची भूमिका साकारणारी निधी भानुशाली Nidhi Bhanushali आठवतेय का? मालिकेत आत्माराम भिडे मास्तरांच्या मुलीची भूमिका साकारणारी निधी सोशल मीडियावर फार सक्रिय असते. निधीचे सोशल मीडियावरील फोटो अनेकदा चर्चेत असतात. नुकताच तिचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये निधी निसर्गाच्या सानिध्यात मनमुराद पोहण्याचा आनंद लुटताना दिसतेय. 'जंगलात खरी मजा आहे', असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmahs Nidhi Bhanushali aka Sonu stuns in bikini)

डोंगर आणि झाडाझुडपांच्या मध्ये असणाऱ्या एका तलावात निधी पोहताना दिसतेय. बिकिनीतील सोनूला पाहून 'तू खूपच बदलली आहेस' अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. निधीच्या या व्हिडीओला दीड लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. निधीने याआधीही सोशल मीडियावर बोल्ड फोटो पोस्ट केले होते. अनेकदा यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

Nidhi Bhanushali
Indian Idol 12 : शन्मुखप्रियाला का होतोय इतका विरोध?

निधीने 'तारक मेहता..' या मालिकेतून अभिनयविश्वात पदार्पण केलं. या मालिकेत तिने अनेक वर्षे काम केल्यानंतर २०१९ मध्ये तिने मालिका सोडली. या मलिकेतील अनेक कलाकारांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यामुळे अनेकदा चाहत्यांमध्ये जेठालाल, दया भाभी, माधवी भाभी, टप्पू किंवा सोनू या कलाकारांची चर्चा होत असते.

Nidhi Bhanushali
शेवटपर्यंत उत्सुकता ताणून ठेवणारे 'हे' ८ चित्रपट पाहिलेत का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com