bapuji
bapuji

तारक मेहताच्या बापूजींचा 'रोमान्स मूड': त्या पोस्टनं चाहते अवाक्

भारतीय मनोरंजन विश्वामध्ये (Indian Televison entertainment) सर्वाधिक लोकप्रिय झालेली मालिका म्हणून तारक मेहता का उल्टा चष्माचं नाव (tarak mehta ka ulta cashma) घेता येईल.

भारतीय मनोरंजन विश्वामध्ये (Indian Televison entertainment) सर्वाधिक लोकप्रिय झालेली मालिका म्हणून तारक मेहता का उल्टा चष्माचं नाव (tarak mehta ka ulta cashma) घेता येईल. गेल्या दीड दशकांहून अधिक काळ या मालिकेनं प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. मालिकेतील वेगवेगळ्या कलाकारांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या मालिकेतील प्रमुख कलाकार जेठालाल उर्फ दिलीप जोशी (Dilip joshi) यांच्या मुलीचा नुकताच विवाहसोहळा पार पडला. दुसरीकडे याच मालिकेतील मुनमुन दत्ता आणि टप्पु यांच्या डेटिंगची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. मात्र यासगळ्यात चर्चेत आले आहेत ते बापुजी. त्यांची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यामध्ये ते एका रोमँटिक मूडमध्ये दिसून येत आहे. (tarak mehta ka ulta chashma stories)

नेटकऱ्यांनी देखील बापुजींच्या त्या पोस्टला मोठ्या (social media video viral) प्रमाणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तारक मेहतामध्ये 70 वर्षांच्या आजोबाची भूमिका करणाऱ्या अमित भट्ट यांचा रियल लाईफमधील प्रवास मोठा प्रेरणादायी आहे. त्यांचं व्यक्तिमत्व प्रभावी आहे. सध्या त्यांचा सोशल मीडियावर एका वेगळ्या अंदाजातील फोटो व्हायरल झाला आहे. त्याला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट दिल्या आहेत. बापुजींचा तो रोमँटिक अंदाज पाहून त्यांना सौम्य धक्का बसला आहे. आजवर बापूजींना तारक मेहतामध्ये कायम विनोदी अंदाजात पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी त्यांचा हा लूक चक्रावून टाकणारा आहे. गेल्या तेरा वर्षांपासून अमित भट्ट हे गोकुळधाम सोसायटीमध्ये आहेत. त्यामध्ये त्यांनी संस्काराचे धडे दिले आहेत. मात्र आता त्यांचे जे काही फोटो व्हायरल झाले आहेत त्यातून त्यांच्याविषयी चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

bapuji
नवीन वर्षात कोणत्या बॉलीवूड 'स्टारकिड्सची' होणार एंट्री?

अमित भट्ट यांच्या रियल लाईफविषयी फार कमी जणांना माहिती आहे. त्यांचे वैयक्तिक आयुष्याशी संबंधित फोटोही फारसे व्हायरल झालेले नाहीत. त्यामुळे चाहत्यांना ते केवळ तारक मेहतामधील बापुजी म्हणून माहिती आहे. आता तो फोटो पाहून चाहत्यांना असा प्रश्न पडला आहे की, आजवर त्या मालिकेमध्ये जेठालाल यांची आई तर कधीच दिसली नाही. मग बापुजी आहेत तरी कोणासोबत...अमित यांनी व्हायरल केलेल्या त्या फोटोमध्ये त्यांची पत्नी कृती भट्ट या आहेत. मात्र सोशल मीडियापासून लांब राहणाऱ्या आहेत. त्यामुळे त्या फारशा तारक मेहताच्या चाहत्यांना माहिती नाहीत.

bapuji
वयाचं कोणाला पडलंय, प्रेम महत्वाचं; वय विसरलेले 5 बॉलीवूड कपल्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com